ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारासामाजिक

तानाजी देशमुख वाढदिवस : मलकापूरात आरोग्य शिबिर संपन्न

कराड :- महाराष्ट्र शासन कामगार विभागाच्या महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातुन कराड दक्षिणचे आमदार अतुलबाबा भोसले यांच्या विशेष सहकार्यातुन मलकापूरचे सामाजिक कार्यकर्ते तानाजी देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटूंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर संपन्न झाले. यामध्ये शहर व परिसरातील नोंदणीकृत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटूंबियांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या २४ वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. सन्मान कष्टाचा आनंद उद्याचा या घोषवाक्याप्रमाणे आरोग्य शिबिरामधून बांधकाम कामगार क्षेञात काम करणार्‍या कष्टकरी कुटूबियांच्या आरोग्याची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांकडून होत आहे. या उपक्रमामुळे कामगार व त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक भाराविना वैधकीय सुविधा मिळणार असुन समाजाच्या आरोग्य विषयक गरजांबाबत समयसुचकता व काळजी व्यक्त करणारा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. शिबिर यशस्वी होण्यासाठी कृष्णा हाॅस्पिटलचे आरोग्य सेवक, बांधकाम विभागाचे योगेश पाटील यांचे सहकार्य लाभले.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे विस्तारक धनाजी माने, मंडल अध्यक्ष राजेंद्र यादव, शंकर निकम, दत्ताञय साळुंखे, युवा मोर्चाचे सुरज शेवाळे, सोशल मिडीयाचे पंकज पाटील, माजी नगरसेवक सुहास जगताप, शहाजी पाटील, प्रशांत चांदे, मालखेडचे मा. सरपंच युवराज पवार, पोलीस पाटील, प्रशांत गावडे, बाबाजी पाटील पतसंस्थेचे चेअरमन आप्पासो पाटील, सचिव अस्लम मुल्ला, अनुलोमचे सुहास कळसे कृष्णत तुपे, किरण कदम, अंकुश कणसे,यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिबिर यशस्वी करण्यासाठी फारुख बागवान, राजेंद्र शिंगण, मंगेश सुरवसे, रामेश्वर आळसे पाटील, सुनिल मगदुम, अजय थोरात, असद तिगडीकर, विशाल सिद, रघुनाथ कुसळे, संभाजी शेडगे, राहूल केंगार, अभिजित रैनाक, सागर माने, किरण रोकडे, गणेश गोडगे यांनी परिश्रम घेतले.

 

फोटो ओळ – शिबिराचा शुभारंभ करताना विजय देशमुख,सुरज शेवाळे,शहाजी पाटील,राजेंद्र शिंगण,मंगेश सुरवसे,रामेश्वर आळसे,फारुख बागवान व इतर

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker