शिक्षकांचा विद्यार्थ्यांकडून झालेला सन्मान हा सर्वात मोठा गाैरव : यशवंत पाटणे
कराड | विद्यार्थ्याच्या उत्कर्षासाठी झटणाऱ्या ज्ञानसाधकांचा सत्कार हा ज्ञानसंस्कृतीचा खरा गाैरव असतो. विद्यार्थ्यांच्याकडून शिक्षकांचा सन्मान म्हणजे जीवनगाैरव पुरस्कार पेक्षा मोठा सन्मान होय, असे गाैरव उदगार जेष्ठ विचारवंत, लेखक, साहित्यिक व प्राचार्य डाॅ. यशवंत पाटणे यांनी काढले. तांबवे (ता. कराड) येथील स्वातंत्र्य सैनिक आण्णा बाळा पाटील विद्यालयातील शिक्षक सन्मान सोहळा व 21 वर्षांनी आयोजित माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक एम. जे. पाटील होते. यावेळी साै. के. व्ही. सुपुगडे, व्ही. वाय. फल्ले, बी. एम. सुर्यवंशी, ए. व्ही. लोटके, डी. देसाई, बी. जी. थोरात, डी. डी. लोखंडे, एन. जे. पाटील, पी. जे. गायकवाड, बी. बी. शिंदे, आर. बी. चव्हाण, एच. पी. पवार, एम. ई. अवघडे, आर. पी. ढगाले, आर. आर. पाटील, व्ही. जे. पाटील या शिक्षकांसोबत ग्रंथपाल पी. एस्. कुलकर्णी, पी. एम्. पवार, बी. ए. वाडते, आर. एन. झुंजार, आर. जे. मदने, डी. बी. साठे या शिक्षकत्तेर कर्मचारी उपस्थित होते.
प्राचार्य यशवंत पाटणे म्हणाले, आज शिक्षण पध्दतीत बदल झाला. सध्याचे विद्यार्थी हे परिक्षार्थी झाल्याने त्याचे कलागुणांकडे दुर्लक्ष करतात. विद्यार्थ्यांनी साहित्य, कला, क्रिडा या क्षेत्राशी नाते जोडले पाहिजे. पूर्वी विद्यार्थ्याच्यातील कलागुण हा एक शिक्षकच अोळखत. त्यामुळेच आजचा हा सोहळा विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूजनांसाठी आयोजिला आहे. शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्यांनी केलेला सन्मान हा सर्वात मोठा असतो. कार्यक्रमात माजी मुख्याध्यापक एच. पी. पवार, एन. जे. पाटील, एम. ई. अवघडे या शिक्षकांनी तसेच प्राजक्ता पाटील, निशिकांत पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अपर्णा लोखंडे व शितल बागवडे यांनी केले. प्रास्ताविक विशाल पाटील यांनी केले. आभार योगेश पाटील यांनी मानले.
शिक्षक सोहळ्यात शिक्षकांना अश्रू अनावर
माजी विद्यार्थी यांनी आपल्या शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देवून प्रमुख पाहुणे प्राचार्य यशवंत पाटणे व विद्यार्थी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना एच. पी. पवार, एन. जे. पाटील सर यांच्या डोळ्यात अश्रू आल्याने उपस्थित शिक्षकांनाही गहिवरून आले.