क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

मित्रच मुख्य सूत्रधार : डोंगरात वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रिणींना लुटण्याचा बनाव उघडकीस

कराड | डोंगरात निर्जनस्थळी वाढदिवसाचा केक कापण्यासाठी गेलेल्या दोन मैत्रीणी आणि त्यांच्या एका मित्राला तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याची घटना बुधवारी घडली होती. यामध्ये मित्रच मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी बनाव करणाऱ्या मित्रास 24 तासात अटक केली असून त्याच्या तीन साथीदारांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. अटक केलेल्या मित्रास न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सचिन कोळी असे पोलीस कोठडी सुनावलेल्या मित्राचे नाव आहे.

Sunil Bamane

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सचिन कोळी हा त्याच्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जाणार होता. मात्र, ज्या मैत्रिणीचा वाढदिवस होता तिच्या मैत्रिणीस घेऊन ये असा अट्टहास सचिन याने धरला. मात्र, त्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यास नकार होता. मात्र, वारंवार विनंती केल्याने अखेर ती वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तयार झाली. सचिन त्या दोन मैत्रिणींना आपल्या अल्टो कारमधून टेंभू येथील निर्जनस्थळी घेऊन गेला. त्याठिकाणी गेल्यानंतर संबंधित दोन्ही युवती आणि सचिन कोळी हा कारमधून उतरून बोलत थांबले होते. त्यावेळी तिथे आलेल्या तिघांनी कोयत्याचा धाक दाखवत सोने आणि मोबाईल काढून घेतले. दरम्यान वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या मैत्रिणीकडे त्या संशयितांनी गळ्यातील चैन काढून दे अशी मागणी केली. मात्र संबंधित युवतीकडे चैन नसल्याने संशयितांनी त्या युवतीस मारहाण केली. दरम्यान त्याच वेळेस युवतीस तिच्या आईचा फोन आला. त्यावेळी त्या युवतीने घाबरत आम्हाला अज्ञातांनी कोयत्याचा धाक दाखवून सोने काढून घेतले आहे. तुम्ही लवकर टेंभू येथील डोंगरात या असे सांगितले. त्यानंतर संशयितांनी तेथून पळ काढला.

या प्रकारानंतर युवतीच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सचिन कोळी व त्याच्या दोन मैत्रिणींना चौकशीसाठी बोलविले. चौकशीत सचिन कोळी याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यात पोलिसांचा संशय बळावला. त्यातच सचिनच्या आईकडेही चौकशी केली असता दोघांच्या उत्तरात विसंगतपणा जाणवला. त्यानंतर पोलिसांनी सचिनकडे अधिक चौकशी केली असता सचिनने हा सगळा दरोड्याचा बनाव आपण मित्रांच्या साथीने केला असल्याचे कबूल केले. या दरोड्याच्या बनावामध्ये सचिनसह त्याच्या तीन साथीदारांचा सहभाग स्पष्ट झाला आहे. पोलिसांनी सचिनला मुख्य सूत्रधार म्हणून अटक केली असून त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सचिनच्या मित्रांचा शोध सुरू असून त्या तिघांनाही लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भैरव कांबळे करीत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker