लाखो भाविकांचे श्रध्दास्थान काळुबाईचे मंदिर आजपासून 8 दिवस बंद

वाई | लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी गडावरील काळुबाईचे मंदिर आठ दिवसासाठी बंद ठेवेले जाणार आहे. गाभाऱ्यातील दुरुस्तीच्या कामासाठी मंदिराचा संपुर्ण गाभारा बंद ठेवला जाणार असल्याचे मंदिर समितीने कळवले आहे. त्यामुळे आजपासून 28 सप्टेंबर या कालावधीत हे मंदिर बंद ठेवले जाणार आहे.
महाराष्ट्रासह परराज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या काळुबाईच्या दर्शनाला दररोज शेकडो भाविकांची तर जानेवारी महिन्यात होणाऱ्या यात्रेला लाखो भाविकांची उपस्थिती असते. या मदिरात आता आठ दिवस गाभाऱ्यातील दर्शन बंद असले तरी या कालावधीत भाविकांना मात्र बाहेरुनच दर्शन घ्यावे लागणार आहे. तेव्हा बाहेरून भाविकांना दर्शन घेता येणार आहे. दि. 21 ते दि. 28 सप्टेंबर दरम्यान गाभाऱ्यात दुरूस्तीचे काम सुरू राहणार आहे.
मांढरदेव गडावर येणाऱ्या भाविकांना समितीकडून कळविण्यात आले असून ज्यांना बाहेरुन दर्शन घ्यायचे आहे. मांढरदेव गडावर ज्यांना यायचे आहे, ते येऊ शकतात. मात्र, गाभाऱ्यात जाऊन देवीचे मुखदर्शन घेता येणार नाही.