मलकापूर- आगाशिवनगरला तणाव ः आ. नितेश राणेंनी मारहाण झालेल्या कुटुंबियांची घेतली भेट
कराड | मलकापूर- आगाशिवनगर येथे सोमवारी दोन समाजातील व्यवसायिकांच्या झालेल्या मारहाणीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते. या प्रकारानंतर मंगळवारी दुपारी पोलिसांनी काही लोकांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मारहाण झालेल्या पवार कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तर माकडा शब्द पोलिसांकडून वापरला गेल्याने पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले.
या प्रकरणात पोलिसांनी मारहाण झालेल्या कुटुंबाला चुकीची वागणूक दिल्याचे समजतात आमदार नितेश राणे यांनी फोनवरून संबंधित पोलीस अधिकाऱ्याला कडक भाषेत समज दिली. तसेच आम्हाला कायदा- सुव्यवस्था हातात घ्यायला लावू नका, असा इशाराच कराड शहर पोलिसांच्या संबंधित अधिकाऱ्यांना आमदार राणे यांनी दिला आहे. तसेच या प्रकरणी सर्व घडामोडी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार असल्याचे सांगितले. या प्रकरणावरून उद्या कराड बंदची दिलेली हाक सकल समाजाने मागे घेतली असून प्रशासनाला निवेदन देणार असल्याचे उपस्थितानी सांगितले. यावेळी राहुल यादव, अजय पावसकर यांच्यासह शेकडो लोकांची उपस्थिती होती.
आ. नितेश राणे यांच्या फोननंतर काही वेळातच कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक के. एन. पाटील यांच्यासह पोलिस फाैजफाटा आगाशिवनगर येथे घटनास्थळी दाखल झाला होता. यावेळी आ. नितेश राणे, पोलिसांच्या येण्याने आणि उपस्थित शेकडो लोकांच्या उपस्थितीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आगाशिवनगर – आ. नितेश राणे यांनी मारहाण झालेल्या पवार कुटुंबियांची भेट घेतली.
आगाशिवनगर ः आ. नितेश राणे यांनी उपस्थित शेकडो लोकांना मार्गदर्शन केले.
आगाशिवनगर ः- आ. राणे जाताच घटनास्थळी उपस्थितांना घरी जाण्यासाठी आवाहन करताना डीवायएसपी अमोल ठाकूर आणि पोलिस कर्मचारी