क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसोलापूर

भयानक : नातवाने पेट्रोल ओतून स्वतः च्या 65 वर्षीय आजीला पेटवले

सोलापूर | पैसे देत नसल्याच्या रागातून 23 वर्षांच्या नातवाने आपल्या स्वतःच्या 65 वर्षांच्या आजीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. यामध्ये आजीचा होरपळून जागीच मृत्यू झाला. या भयानक प्रकारामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. तसेच घटनास्थळावरून फरार झालेल्या नातवाला पोलिसांनी अटक केले आहे. हर्षद संभुदेव शिंदे (वय- 23, रा. राजगुरूनगर, पुणे) असे नातवाचे नाव आहे. शांताबाई पंढरीनाथ शिंदे (वय- 65, रा. लऊळ) असे या घटनेत मृत्यू झालेल्या आजीचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, लऊळ (ता. माढा) येथे रविवारी (ता. 6) सकाळी साडेनऊच्या दरम्यान भवर वस्तीवरील पंढरीनाथ शिंदे यांच्या राहत्या घरासमोर घडली. कुलदीप संजय कोकाटे (वय- 24) यांच्या फिर्यादीवरून कुर्डुवाडी (जि. सोलापूर) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला कुर्डुवाडी येथील परांडा चौकात काही तासांतच अटक करण्यात पोलिसांना यश आले. फिर्यादी संजय कोकाटे हे रविवारी सकाळी गाईच्या धारा काढून दूध डेअरीवर दूध घालून घराकडे जात असताना, चिंचेच्या झाडाखाली मोठा जाळ दिसला. जवळ जाऊन पाहिले असता आजी पेटलेली दिसली. आजूबाजूला पाहिले असता संशयित आरोपी हर्षद शिंदे हा पळून जाताना दिसला.

संजय कोकाटे यांनी तातडीने घरी जाऊन आई- वडिलांना घेऊन घटनास्थळी आले, आईने आरडाओरड केला असता बाजूचे लोक जमा झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली व फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले. पोलिस उपअधीक्षक पाटील व पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत वाघमारे तपास करीत आहेत..

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker