पाटण तालुक्यातील बेपत्ता युवकाचा मृतदेह कोयना नदीपात्रात आढळला

पाटण प्रतिनिधी | संजय कांबळे
पाटण तालुक्यातील तामकडे गावाच्या हद्दीतील कोयना नदी पात्रात चार दिवसापासुन बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह आढळुन आला असुन या घटनेची पाटण पोलीस स्टेशनमधे नोंद झाली असुन अधिक तपास करीत आहेत.
बनपेठ- येराड (ता. पाटण) येथील रूपेश मनोहर चव्हाण (वय- 30) हा युवक मंगळवारी सायंकाळपासुन घरात न सांगता निघुन गेला होता. त्यानंतर दोन दिवस त्याच्या नातेवाईकांनी शोधशोधा केली असता आढळुन न आलेनं गुरूवारी या बाबत हरवलेला असल्याची खबर पाटण पोलीस स्टेशनमधे दिली होती. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तामकडे गावाच्या हद्दीतील कोयना नदी पात्रातील झाडामधे एक मृतदेह अडकलेला आढळुन असल्याची माहिती समजात पाहण्यास लोकांनी गर्दी केली होती. मात्र, चेहरा पाण्यात असलेनं ओळख पटत नव्हती. घटनेची माहिती पोलीसाना दिली असता पोलीस निरीक्षक विकास पाडळे सह पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले असता. मृतदेह पात्राबाहेर काढुन रूपेश चव्हाण च्या नातेवाईकांना दाखवला असता त्याची खात्री पटली होती. पाटण येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनानंतर कोयना नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात आले.
रूपेश चव्हाण हा सनी स्पोर्टस् येराडचा दर्जेदार क्रिकेट खेळाडु म्हणुन तालुक्यात परिचीत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार असून त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची नोंद पाटण पोलीस स्टेशनमधे झाली असुन मृत्यूचे कारण अजुन अस्पष्ट आहे. तरी घटनेचा अधिक तपास हवालदार ए. एम. आवाड करत आहेत