क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनब्रेकिंगराज्यसातारा

कराडच्या पुरवठा शाखेत अधिकाऱ्याचा दम, कानशिलात लागावेन

कराड :-  कराड शहर आणि ग्रामीण भागातून शासकीय कामासाठी लोक येत असतात. मंगळवारी एकजण रेशनिंग कार्डवरील कामाबाबत आला असताना, चक्क त्या व्यक्तीला कानाखाली देण्याची भाषा करत दम दिला. अधिकाऱ्याच्या या भाषेमुळे पुरवठा विभागात काही काळ गोंधळ उडाला होता.

शिधापत्रिकेतील नांव बदलामुळे रेशनिंग धान्य मिळत नसल्याने संबधित व्यक्ती मंगळवारी सकाळी पुरवठा शाखेत आला. तेव्हा त्याला तेथून बाहेरून काही कागदपत्रे घेऊन यायला सांगितले. त्यानंतर बारा अंकी नंबरविषयी विचारणा केली. तसेच तिसर्या मजल्यावर जाण्यास सांगितले. या सर्व पूर्तता करून आल्यानंतर सायंकाळी 5 वाजता साहेब नसल्याने उद्या येण्यास सांगितले.

कर्मचाऱ्यांनी उद्या यायला सांगताच संबधित रेशनकार्ड धारक चांगलाच संतापला. त्याने आम्हाला काही काम नाहीत का? सकाळपासून बाहेर जावा, खाली जावा- वर जावासांगताय. आता साहेब नाहीत, उद्या या म्हणताय. सकाळीच साहेब नाहीत सांगायचं, असे म्हणतं पुरवठा शाखेतील कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

यावेळी तेथे असलेल्या कर्मचाऱ्यापैकी एकाने त्या व्यक्तीला थेट कानाखाली लागावेन असा दमच दिला. यानंतर त्या व्यक्तीने मला मारा, असे म्हणताच उपस्थित लोक त्याठिकाणी गोळा झाले. कर्मचाऱ्यांच्या या उद्धट वर्तनामुळे लोकांच्यात चांगलीच चर्चा रंगली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker