प्रकाश आंबेडकर आणि मंत्री शंभूराज देसाईंत जुंपली : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कंत्राटी भरतीवरून वंचितला टोला

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. यावेळी राज्यात पुर्णपणे खाजगीकरणाची सुरुवात झाली आहे. तेव्हा आता राजकारणातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदे ही खासगी कंत्राटी पध्दतीने भरावीत असा टोला लगावला होता. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी समाचार घेतला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाचा एकही आमदार विधानभवनात नाही. तेव्हा त्यांनी यांचा विचार करावा, असा टोला लगावला आहे. या दोन्ही नेत्यांच्यात कंत्राटी भरतीवरून चांगलीच जुंपली असल्याचे दिसून आले आहे.
पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले, एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या ही पेक्षा अधिक क्षमतेचे मराठा किंवा ब्राम्हण समाजाचे नैतिकता असणारी अनेक माणसं आहेत. तेव्हा याची ही जाहिरात करा आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही सुद्धा कंत्राटी पद्धतीनं भरायला सुरुवात करु अस टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. राज्यात ग्रामसेवक ही पद भरली जाणार आहेत. त्यासाठी TCI च्या प्रणाली मध्ये 11 लाख अर्ज आले असुन यासाठी 1 हजार रुपये घेण्यात आले आहेत. यामुळं या मधुन TCI ला 120 कोटींचा नफा झाला आहे. यामध्ये बाद झालेल्या अर्जाची रक्कम पुन्हा परत केली जाणार का हे सुद्धा पाहावं लागेल.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांचा महाराष्ट्राच्या विधानभवनात 288 आमदारांपैकी एकही आमदार नाही. तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी 170 हून अधिक बहुमत असलेल्या महायुतीच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबाबत केलेले वक्तव्य हे निंदनीय आहे. प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडीचा फायदा मोदींना होईल की महायुतीला त्यांचा विचार करू नये. पहिल्यांदा स्वतःला इंडिया आघाडीत विचारत नाहीत, यांचा विचार करावा.