पश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

राज्यात जागृत ग्राहकराजा संघटनेचे काम जोमात सुरू : राज्य अध्यक्ष दिलीप फडके

मसूर प्रतिनिधी। गजानन गिरी
जागृत ग्राहकराजा सामाजिक संघटनेचे काम राज्यात 17 जिल्ह्यात कार्यक्षमपणे सुरू आहे. ग्राहकांचे अधिकार व त्यांचे हक्क त्यांना मिळालेच पाहिजेत. ग्राहक जागृत करण्यासाठी ग्राहक चळवळीचे काम जोमाने सुरू असल्याची माहिती जागृत ग्राहकराजा संघटनेचे राज्य अध्यक्ष दिलीप फडके यांनी मसूरच्या ॲड. दादासाहेब चव्हाण विद्या संकुलाच्या सभागृहात प्रांत – जिल्हा बैठकीत बोलताना केले. संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी वडूजला 27 ऑगस्टला प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रा. नागनाथ स्वामी यांनी लिहिलेल्या कार्यकर्ता पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात येणार असल्याची माहितीही दिली.

संघटनेचे राज्य अध्यक्ष दिलीप पाटील, महिला प्रांत संघटक शैला शिळीमकर, प्रांत सदस्या साधना पाटील, प्रांत सदस्य अनंत खोचरे, जिल्हा संघटक प्राचार्य विक्रम शिंदे, सहसंघटक प्रकाश शिंदे, जिल्हा अध्यक्ष प्रा नागनाथ स्वामी, जिल्हा उपाध्यक्ष रामानंद पुजारी, शिराळा तालुका अध्यक्ष हंबीरराव देशमुख, माण तालुका अध्यक्ष सुभाष पवार, पाटण तालुका सदस्य निलेश बांडे, खटाव तालुका अध्यक्ष विनोद लोहार, कराड तालुका अध्यक्ष पत्रकार गजानन गिरी, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण राजमाने, सचिव पत्रकार दिलीप माने,सदस्य पत्रकार उमेश पाटील, कोरेगावचे सदस्य शेखर माने, विक्रम माने उपस्थित होते.

दिलीप पाटील म्हणाले, ग्राहक संघटीत करण्याच्या दृष्टीने ग्राहक चळवळीचा उद्देश आहे. शेतकरी न्यायासाठी ग्राहक न्यायालयात गेल्यास 90 टक्के न्याय मिळतो. शेतकऱ्यांसाठी मेळावे घेण्याबरोबर ग्राहक सक्षम बनवण्याचा प्रयत्न राहणार आहे.
शैला शिळीमकर यांनी महिलांना सबल बनवण्याचा प्रयत्न सुरू असून पुण्यात 200 महिलांचे बचत गट चालवत असल्याचे स्पष्ट केले. साधना पाटील यांनी युवकाना व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न सुरू असून या प्रयत्नात चांगले यश आल्याचे सांगितले.

प्रा. नागनाथ स्वामी यांनी जागृत ग्राहकराजा संघटनेच्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिराचे व कार्यकर्ता पुस्तकाचे प्रकाशनाचे नियोजन व तयारी झाली असल्याचे सांगितले. संघटनेच्या तालुका संघटकपदी वीरसिंह आफळे, तालुका उपाध्यक्षपदी लक्ष्मण राजमाने, तालुका सचिवपदी दिलीप माने यांची निवड झाल्याबद्दल त्यांना दिलीप फडके व मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष सदाशिव रामुगडे यांचे संघटनेचे नवीन सदस्यपद स्वीकारल्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा नागनाथ स्वामी यांनी केले. जिल्हा सचिव विद्याधर कुलकर्णी यांनी आभार मानले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker