माजी नगरसेवकाच्या बंगल्यातील साहित्याची चोरी : रिक्षाचलक आणि दोन महिला ताब्यात
सातारा | सातारा शहरातील मंगळवारपेठ ढोणे कॉलनी येथील नगरसेवक रविंद्र ढोणे यांचे बंगल्याचे बांधकाम साईटवरील लोखंडी साहीत्याची अनोळखी महीलांनी चोरी केली. याबाबतची फिर्याद विजय रमेश देशमुख (रा.चिमणपुरापेठ सातारा) यांनी दिली होती. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात शाहुपूरी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी बजरंग यशवंत काळे (वय- 33, रिक्षाचालक, रा.काळे वस्ती, यश ढाब्याचेमागे कोंडवे), सोमावती विजय घाडगे (वय- 30, रा.गोसावीवस्ती, सैदापुर), पुनम मुकेश जाधव (वय- 25, रा.गोसावीवस्ती, सैदापुर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीसांनी घटनास्थळी भेट देवुन त्याठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. या गुन्हयात वापर झाले रिक्षाबाबत माहीती प्राप्त केली होती. दरम्यान, शाहुपुरी पोलीस ठाणेचे पो.हे.कॉ. डमकले हे रात्रपाळी कर्तव्यावर असतांना पहाटेचे सुमारास त्यांना एका रिक्षामध्ये दोन महीला संशयितरित्या फिरतांना आढळुन आल्या. त्यामुळे त्यांनी सदरची रिक्षा व त्यामधील दोन संशयित महीला व रिक्षाचालक यांना पोलीस ठाणेस आणले. संशयित रिक्षाचालक व त्या दोन महीलांकडे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने कौशल्याने विचारपुस करुन तपास केला. तेव्हा त्यांनी ढोणे कॉलनीतील बांधकामावरील लोखंडी साहीत्याची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांचेकडुन गुन्ह्यातील चोरुन नेलेले बांधकाम साईटवरील लोखंडी रिंगा, लोखंडी बार असे साहीत्य तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली रिक्षा व मोबाईल हॅन्डसेट असा एकुण 1 लाख 35 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे. सदर गुन्ह्यातील रिक्षाचालक आरोपी व दोन महीला या रेकॉडवरील सराईत चोर असल्याचे व त्यांचेवर यापुर्वी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. अधिक तपास पो.हे.कॉ. हसन तडवी करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक बापु बांगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो. हेड. कॉ. हसन तडवी, लैलेश फडतरे, तुषार डमकले, पो.ना.अमीत माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, पो.कॉ.सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, चालक शशिकांत नलवडे यांनी केली आहे.