शिरवळ येथील कंपनीतून माल चोरणारे व विकत घेणारे पोलिसांच्या ताब्यात : चाैघांना अटक

सातारा| शिरवळ (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील निसार ट्रान्सफॉर्मर प्रा.लि. या ट्रान्सफॉर्मर निर्मीती करणाऱ्या कंपनीत दि. 12 रोजी रात्रीच्या वेळी 4 ते 5 चोरट्यांनी प्रवेश करून चोरी केली. कंपनीत नवीन ट्रान्सफॉर्मर्स तयार करण्यासाठी वापरले जाणारे तांब्याच्या तारा व पट्टया तसेच बांबीचे बंन्डल असा एकूण 10 लाख 58 हजार 400 रूपये किमतीचे सुमारे 1512 किलोची चोरीस गेले होते. फिर्यादीवरून शिरवळ पोलीस ठाणे येथे घरफोडी चोरीचा गुन्हा दि. 14 रोजी दाखल करणेत आला होता. या गुन्ह्यातील संशयित 3 आरोपींना शिरवळ पोलिसांनी अटक केली असून माल विकत घेणाऱ्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात अविनाश दिपक मछले ऊर्फ कोकाटे (वय- 24 वर्ष, स्वप्नील महेश गारुंगे (वय-23 वर्ष,दोन्ही रा.शिवाजी यूनिवर्सिटी कोल्हापुर, ता. करवीर जि. कोल्हापुर), शिवाजी प्रभु तोरे (वय- 42 वर्ष, हल्ली रा. पिंटु शिखरे यांची खोली, साळुंके कॉलनी, भारतनगर कॉलनी कोल्हापुर, मुळ रा. जिवळी, ता. लोहारा . जि. उस्मानाबाद), विनायक बाळासो गोसावी (वय- 42, रा. गुटकेश्वरकाॅलनी शिंगणापूर- कोल्हापूर) अशी संशयित आरोपीची नावे आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी, कंपनीतील चोरीचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने अनोळखी आरोपी यांचा शोध घेण्याकरीता तपासपथके बनवुन तपासाचे मार्गदर्शन व सुचना दिल्या. वरीष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनात शिरवळ पोलीस पथक यांनी वेगवेगळया ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तसेच तांत्रीक व गोपनिय माहितीच्या आधारे कोल्हापुर येथून दोन संशयीतांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन विचारपुस केली. अटक करणेत आलेल्या आरोपी यांनी त्यांनी तसेच त्यांचे इतर साथीदार यांनी मिळून कोल्हापुर येथून रात्रीच्या वेळी गुन्हा घडल्या ठिकाणी येऊन कंपनीतील कॉपर चोरुन कोल्हापुर येथे घेऊन गेल्याची कबुली दिली. सदर आरोपी यांचे कडुन पोलीस तपासात प्राप्त माहितीच्या आधारे गुन्हयात वापरलेले वाहन पीकअप व त्याचा चालक त्याच बरोबर गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल विकत घेणारा यास ताब्यात घेतले आले. त्यांचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेला माल जप्त करणेत आला गुन्हयात वापरलेले वाहन पीकअप जीप व चोरीस गेलेला माल असा मिळून सुमारे 13 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर व उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभाग फलटणचे राहूल धस यांचे मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक नवनाथ मदने, सहा. पोलीस निरिक्षक चिमाजी केंद्रे, पोलीस उप-निरिक्षक सतिश आंदेलवार, पोलीस उप निरिक्षक शंकर पांगारे, पोलीस उप- निरिक्षक अब्दुल बिद्री, सहा. पी. फौ. अनिल बारेला, पोलीस हवालदार जितेंद्र शिंदे, सचिन वीर सुरेश मोरे, पोलीस नाईक प्रशांत धुमाळ, पोक मंगेश मोझर, अजित बोराटे, संग्राम भोईटे यांच्या पथकाने केली आहे.