माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धमकी : कराडमध्ये बंदोबस्त वाढविला

कराड | माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना ईमेल करून धमकी देण्यात आल्याने त्यांच्या कराडमधील निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे- गुरुजी यांच्यावर कारवाई करण्याच्या विधानसभेतील मागणीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांना अज्ञाता कडुन धमकीचा ईमेल आला आहे. त्यामुळे आता महात्मा गांधी यांच्यावरील विधानाचे प्रकरण चांगलेच तापले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे- गुरूजी यांचा एक व्हिडिअो समोर आला असून ते महात्मा गांधी यांच्याविषयी बोलताना दिसत आहेत. त्यानंतर विधानसभेच्या अधिवेशानात संभाजी भिडे यांच्यावर कारवाईची व अटकेची मागणी केली होती. त्यानंतर राज्यभर काॅंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्यभर काल आंदोलन केले आहे.
सांगली जिल्ह्यातील असलेले संभाजी भिडे- गुरूजी हे आहेत. तर पृथ्वीराज चव्हाण सातारा जिल्ह्यातील असल्याने आता दोन्ही जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा अलर्ट झालेली आहेत. तर सध्या पृथ्वीराज चव्हाण हे कराडमधील पाटण काॅलनीतील आपल्या निवासस्थानी असल्याने पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. या धमकी प्रकरणी कराड पोलिसांत अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.