कोयना बॅंकेच्या माध्यमातून कराड- मलकापूर भागातील लोकांचे जीवनमान उंचावेल : ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर
कोयना बँकेच्या मलकापूर शाखेचा स्थलांतर समारंभ

कराड | कोयना बॅंकेने शेतकऱ्यांसह सामान्य ग्राहकांचे हित जोपासले आहे. आधुनिकीकरणांसह सर्व शाखा आता सोयीसुविधा देत असून व्यावसायिक तसेच उद्योजक यांच्याही जीवनात आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला आहे. कराड- मलकापूर भागातील सर्व स्थरातील लोकांचे जीवनमान उंचविण्याचे काम मलकापूर शाखेच्या माध्यमातून बॅंक करेल, असा विश्वास असल्याचे बॅंकेचे संस्थापक ॲड. उदयसिंह पाटील यांनी व्यक्त केला.
कोयना सहकारी बँक लि, कराड या बँकेच्या मलकापूर (ता. कराड) या शाखेचे स्थलांतर कराड ढेबेवाडी रोडलगत, आगाशिवनगर येथे सुसज्ज, नूतन व भव्य वास्तूत बँकेचे संस्थापक ॲड. उदयसिंह पाटील यांचे शुभहस्ते, मलकापूरच्या नगराध्यक्षा सौ. निलमताई येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, उपाध्यक्ष विजय मुठेकर, मलकापूरच्या नगरसेविका सौ. कमलताई कुराडे, राजेंद्र यादव, अमर इंगवले, माजी नगरसेवक व बँकेचे संचालक सागर जाधव, प्रा. धनाजी काटकर, बँकेचे संचालक तसेच कोयना रयत समूहातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, बँकेचे सभासद, खातेदार यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
बँकेने अधुनिक बँकिंग तंत्रज्ञानाबरोबरच तत्पर ग्राहक सेवा, पारदर्शकता इ. चा अवलंब करत रिझव्ह बँक ऑफ इंडीया यांची सर्व प्रमाणके पूर्ण केली आहेत. बँकेने ग्राहकांना मोबाईल बँकिंग सुविधा बरोबरच ए. टी. एम. (डेबीट कार्ड), डिमांड ड्राफ्ट, आर टी जी एस / एन ई एफ.टी/ ए.टी.एम/ सी टी एस क्लिअरिंग/ एस एम एस / तसेच मिस्ड कॉल इत्यादी सुविधा कार्यान्वित केल्या आहेत. बँकेच्या ठेवी व कर्ज योजनांचा मलकापूर- आगाशिवनगर परिसरातील सभासद, खातेदारानी लाभ घ्यावा, असे अवाहन बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील यांनी यावेळी केले.



