अनंत चतुर्थीला कराड शहरात वाहतुकीत बदल, काही ठिकाणी नो एंन्ट्री : सपोनि चेतन मछले

कराड | शहरात गणपती विसर्जना दिवशी गुरूवारी (दि. 28) वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. शहरातील दत्त चाैक- चावडी चाैक ते कृष्णा घाट या मुख्य मार्गावर दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांना प्रवेश करण्यास तसेच पार्किंग करण्यास मनाई असल्याचे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मछले यांनी सांगितले आहे.
गुरूवारी अनंत चर्तुदशी असल्याने कराड शहरातील तसेच कराड तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या तसेच घरगुती गणेश मुर्तीचे मोठ्या प्रमाणात विसर्जन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक, सातारा समीर शेख यांनी गुरूवारी दि. 28 रोजी सकाळी 6 ते दि. 29 रोजी सकाळी 7 पर्यंत वाहतुकीत बदल करण्याचा आदेश दिला आहे.
अनंत चतुर्थी दिवशी कराड शहरात वाहतूकीतील बदल पुढीलप्रमाणे ः-
1) कृष्णा नाका बाजुकडुन कराड शहरात सोमवार पेठ मार्गे कृष्णा घाटकडे जाणारी वाहतुक ही कृष्णा नाका जोतीबा मंदीर- कमानी मारुती मंदीर- सोमवार पेठ पाण्याची टाकी- जनकल्याण बँक या मार्गे जाईल. तसेच सोमवार पेठ येथील नागरिक कराड शहरातून बाहेर जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतील.
2) कोल्हापुर नाका बाजुकडुन कराड शहरात येणारी व कृष्णा घाटाकडे जाणारी वाहतुक ही दत्त चौक- आझाद चौक- सात शहीद चौक- शुक्रवार पेठ- बालाजी मंदीर या मार्गावरून जाईल.
3) दत्त चौक- यशवंत हायस्कूल- आझाद चौक- नेहरु चौक- चावडी चौक- बालाजी मंदीर- झेंडा चौक- कृष्णा घाट या गणेश विसर्जन मिरवणुक मार्गावर सर्व वाहनांना (दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने) प्रवेश करण्यास अथवा पार्किंग करण्यास मनाई करणेत आलेली आहे.
4) दत्त चौकाकडे येणा-या सर्व अवजड वाहनांना प्रवेश बंद करणेत आलेला आहे.
5) आपत्कालीन परस्थितीमध्ये नेहमीच मिरवणुक मार्गासाठी पर्यायी रस्ता कर्मवीर पतळा- पायल फुटवेअर- अंडी चौक ते पाण्याची टाकी, रविवार पेठ ते नेहरु चौक या मार्गावरील दुर्तफा दुचाकी व चारचाकी वाहने नो पार्कींग झोन करणेत आलेला आहे.
6) वरील सर्व मार्गावर रुग्णवाहीका, अग्निशामक वाहने, पोलीस दलाची वाहने वगळुन इतर सर्व वाहनांच्या मार्गात उपरोक्त प्रमाणे बदल करणेत आलेला आहे.