क्राइमखेळताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रसातारा

यात्रेत कुस्ती स्पर्धेत दोन गटात भांडणे : 9 जणांवर गुन्हा

निंभोरे येथे दर्गा यात्रेतील प्रकार

फलटण प्रतिनिधी। अनमोल जगताप
फलटण तालुक्यातील मौजे निंभोरे येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ओट्याजवळ निंभोरे गावातील श्री.राजे राजवल्ली पिरसाहेब दर्गा यात्रेच्या निमित्ताने 4 वाजण्याच्या सुमारास कुस्ती स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तेथे दोन गटात भांडणे झाली. त्यावेळी कल्पेश कांबळे यांना धारधार शस्त्राने मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी हे कुस्ती पहात असताना कुस्त्या खेळायचे तुमचे काम नाही असे आरोपी फिर्यादी यांना म्हणाले. या कारणावरून त्यांच्या मध्ये वाद निर्माण झाला. तेव्हा आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी यांना लोखंडी गज, सुरा व काठी अशा हत्यारांनी मारहाण करून जखमी केले. व फिर्यादीस तुमच्या कुस्त्या खेळायचे काम नाही असे जातीवाचक बोलले. तसेच त्यांची मोटरसायकल क्रमांक (एमएच- 11- डीएफ- 4575) हिच्यावर दगड मारून नुकसान केले.

संशयित आरोपी 1) विजय शिवाजी जाधव, 2)निलेश मदने, 3)नितीन मदने, 4) प्रदीप जाधव, 5)शिवाजी जाधव, 6)बापू वाघमोडे, 7)सुरेश पिसाळ, 8)अजय भंडलकर, 9)किरण वसव (सर्व राहणार- निंभोरे, ता.फलटण,जि.सातारा) यांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे करीत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker