“काैन है, शरद पवार मैं नही जानता” : भाजपाच्या मंत्र्याचा पलटवार

सातारा । “काैन है शरद पवार मै नही जानता, शरद पवारांना मी ओळखत नाही. ते सर्व गोष्टी त्याच्या हिशोबाने बोलत असतात. केवळ 5 ते 6 खासदार असणाऱ्या पक्षाला आम्ही गृहीत धरत नाही. शरद पवारांनी माझ्या मतदार संघात येऊन एकदा स्वतःहा निवडणूक लढवून दाखवावी असे प्रतिआव्हान भाजपचे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी दिल आहे.
काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारले होते. यानंतर शरद पवारांनी कोन? मिश्रा मी त्यांना ओळखत नाही अशी टीका त्यांनी केली होती त्याला मंत्री अजय कुमार मिश्रा यांनी आज प्रत्युत्तर दिल. भारतीय जनता पक्षाला सत्तेत येऊन नऊ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी आज आयोजित पत्रकार परिषदेत श्री. मिश्रा बोलत होते.
यावेळी माजी खासदार अमर साबळे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, अतुल भोसले, विक्रम पावसकर, भरत पाटील, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, मदन भोसले, भीमराव पाटील आदी उपस्थित होते. पुढे श्री. मिश्रा म्हणाले, “नरेंद्र मोदी सरकार 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर देशातील लोकांचे जीवनमान उंचाविण्याचा निर्धार केला होता. मतदारांना दिलेला शब्द पूर्ण करत देशातील अनेक गरजू मदत केली.