काका- पुतण्याचं राजकारण नवं नाही पण पुतण्या खळखळ करतोय : सदाभाऊ खोत
कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
शरद पवार आणि अजित पवार या काका- पुतण्याचं राजकारण नव नाही, फार जुनं आहे. महाराष्ट्राने एकदा काका मला वाचवा अशी आर्त हाक ऐकली आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्यावरून माजी मंत्री व भाजपाचे सहकारी सदाभाऊ खोत यांनी ग्रामीण भाषेत समाचार घेतला. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी संघटनेचे नेते सचिन नलवडे, अमोलराजे जाधव, संजय साळुंखे, अशोक लोहार, शिवाजी फुडील, शंकर पवार, बाळासाहेब पवार, बापूराव जगदाळे, अनिल डुबल, नागराज शिंदे, प्रसाद धोकटे, सुनील भुसाली, कृष्णा क्षीरसागर आदी उपस्थित होते. यांच्या रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, अजित दादा वाईट काय आहे, मुख्यमंत्री झाला काय नाय झाला काय. काका मला वाचवा अशी आर्त हाक या महाराष्ट्रामध्ये एकदा आपल्याला ऐकायला मिळाली आहे. काका- पुतण्याचे राजकारण नवं नाही, ते फार जुन आहे. आता पुतण्याला वाटणारचं की हे म्हातारं, मला आता पाक म्हातारं करित आणलं तरी हातात कारभार देईना. त्यामुळे पुतण्या कधीतरी खळखळ करतूया. मग म्हातारं काठी घुगरंसह वाजवतयं. त्यामुळे त्या घुगराच्या आजूबाजूचे गडी धावत येतायतं. पुतण्या काकाची जागा एकटाच हाणील, आपल्यला बी मिळाली पाहिजे.