(Video) साताऱ्यात दिवाळीला आणलेल्या फटाक्यांमुळे घराला आग

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
ऐन दिवाळीत साताऱ्यातील मध्यभागी असणाऱ्या प्रतापगंज पेठेतील एसबीआय बँकेसमोरील घरात ठेवलेल्या फटाक्यांमुळे घराला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे परिसरात सातारा शहरातील नागरिकांनी प्रतापगंज पेठेत गर्दी केली होती. सुदैवाने सातारा पालिकेच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थाळी दाखल होत आग आटोक्यात आणली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, दिवाळी सणाची सर्वत्र धांदल उडाली असून अनेकांनी फटाके खरेदी केले आहेत. प्रतापगंज पेठेतील एका घरात दिवाळीसाठी आणलेले फटाके पेटल्याने घराला आग लागली. गुरूवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीमुळे आणि फटाक्याच्या आवाजामुळे परिसरातील लोकांनी आग लागलेल्या घराकडे धाव घेतली. तातडीने काहींनी वीजपुरवठा खंडीत केला. या आगीमुळे संबधित घरातील लोकांच्यात भीतीचे वातावरण पहायला मिळाले.
प्रतापगंज पेठेत आग लागल्याचे समजताच सातारा पालिकेच्या अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आली. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घरातील साहित्य, फटाके आणि गॅस घराबाहेर सुरक्षितता करण्यात आली. या घटनेत कोणीही जखमी झालं नसून घरातील साहित्याचं नुकसान झालं असल्याचं सांगण्यात येत आहे.



