सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस येथील सिमोल्लघंन सोहळ्याला सुरुवात झाली असून प्रशासनाच्या वतीने प्रथमच या सोहळ्यात सहभाग घेतला आहे. जलमंदिर पॅलेस येथे खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले.
दसऱ्यानिमित्त सातारा शहरातून उंट, घोडे, हत्ती आणि पारंपारिक वाद्याने भव्य मिरवणूक काढण्यास सुरूवात झाली आहे. यावेळी पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी उपस्थित आहेत. कोल्हापूर शहरातील शाही दसरा सोहळ्याच्या धरतीवरती प्रथमच साताऱ्यात दसरा साजरा होत आहे. यामुळे शहरातील नागरिकांच्यात कुतूहुल आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी या मिरवणूकीचे स्वागत करण्यासाठी गर्दी केली आहे.
छ. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थित निघणाऱ्या या मिरवणूकीत पारंपारिक वाद्ये वाजविण्यात येत आहेत. लोकांच्याकडून सोने लुटण्यासाठी उत्सुकता दिसून येत आहे. जलमंदिर येथील भवानी तलवारीच्या पूजनानंतर भव्य अशी मिरवणूक सुरू झाली आहे. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी फटाक्यांची अतिषबाजीही करण्यात येत आहे. शाही दसरा साजरा होत असल्याने सातारकरांच्यात आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.