क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा
Video : कराडच्या दत्त चाैकात ‘द बर्निंग कार’चा थरार

कराड | येथील दत्त चौकामध्ये द बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. चालत्या गाडीने अचानक पेट घेतल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. ही घटना बुधवारी सायंकाळी 6 वाजता घडली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आली. मात्र आगीमध्ये कारचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
गुढी पाडव्यानिमित्त बाजारपेेठेसह शहरतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. बुधवारी सायंकाळी 6 च्या सुमारास दत्त चौकामध्ये चालत्या कारने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने तात्काळ गाडी थांबवली. कारमधील सर्वजण खाली उतरले. नजीक असलेल्या व्यापार्यांनी कारवर पाणी मारून आग आटोक्यात आणली.
द बर्निंग कारच्या थराराची चर्चा शहरात काही वेळात पोहचल्याने अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पेटलेली कार बाजूला करित वाहतूक सुरळीत केली.