नदीकाठी सतर्कतेचा इशारा : कोयना धरणातून 33 हजार 50 क्युसेस शतक पाणी सोडणार
सातारा :- जिल्ह्यात पाऊस थांबला असला तरी धरणक्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे आणि वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याता आला आहे.
गुरूवारी (दि. 29) सकाळी ६:०० वा कोयना धरणामध्ये एकूण १०३.४० टीएमसी (९८.२४%) पाणीसाठा आहे. पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज सकाळी ६:०० वा. धरणाचे सहा वक्र दरवाजे ३ फूट ६ इंच उघडून सांडव्यावरून ३०,९५० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे. येव्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येईल.
धरण पायथा विद्युत गृहामधील २,१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ३३,०५० क्युसेक्स आहे. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. गेल्या आठवड्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर आहे.