कापीलमधील वाड्या- वस्त्यांना तीन नेत्यांच्या प्रयत्नाने मिळणार पाणी
विशाल वामनराव पाटील
सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या निधीतून व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड. उदयसिंह पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने कापील गावातील उर्वरित वाडी वस्तीसाठी जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेचा शुभारंभ करण्यात झाल्याने कापील गावातील कटपान मळा, हौद मळा, घुमुट मळा, सावंत वस्ती, देशमुख वस्ती, इंगळे वस्ती आदी सर्व वस्त्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे.
या योजनेसाठी कापील ग्रामपंचायतीचे सदस्य व कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन ढापरे, ग्रामपंचायत सदस्य धोंडिराम मोरे, माजी सदस्य भाऊसाहेब ढेबे यांनी विशेष पाठपुरावा केला होता. जलजीवन योजनेच्या भूमिपूजन समारंभावेळी सरपंच सौ. कल्पना गायकवाड, उपसरपंच सौ. सुषमा देशमुख, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन ढापरे, खरेदी विक्री संघाचे व्हाइस चेअरमन जगन्नाथ मोरे, कमलाकर मोरे, ग्रामपंचायत सदस्या सुनीता कुंभार, सदस्य धोंडीराम मोरे, प्रदीप जाधव, पराग जाधव, सुरेश जाधव, प्रल्हाद देशमुख, पांडुरंग देशमुख, भाऊसाहेब ढेबे, दीपक जाधव, शशिकांत जाधव, नंदकुमार जाधव, राजाराम थोरात, राहुल पाटील, भरत पाटील, सयाजी मोरे, शिवाजी देशमुख, तानाजी गायकवाड यांच्यासह पाणी पुरवठा समिती सदस्य, विविध संस्थाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
बाजार समितीचे संचालक नितीन ढापरे म्हणाले, आज गावच्या वाड्या- वस्त्यांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच पाणी पोहचेल. कराडचे राजकारण हे समाजाभिमुख राहिले आहे. त्यामुळे विकासकामात कधीच राजकारण होत नाही. यापुढील आगामी काळातही विकासकामे हाच मुद्दा ठेवून गावचा विकास केला जाईल.