कराड शहराला उद्या पाणी नाही, तर रविवारीही पाणीबाबत सूचना

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील
येत्या काही दिवसात मान्सूनचे आगमन होवून पावसाळा सुरू होवू शकतो, त्यामुळे कराड पालिकेकडून पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवस पाणी पुरवठा बाबत जाहीर निवेदन पालिकेकडून काढण्यात आले आहे. यामध्ये उद्या शहराचा पाणी पुरवठा बंद राहील, तर रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी सांगितले आहे.

कराड शहरातील सर्व नागरिकांना जाहीर निवेदनाद्वारे कळविणेत येते की, शनिवार दिनांक 17/06/2023 रोजी जलशुध्दीकरण केंद्र येथे पावसाळच्या पुर्वतयारीच्या दृष्टीने पाणी निवळण टाकीमधील गाळ काढणेचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याबाबत काही बदल करण्यात आले आहेत, यांची नागरिकांनी नोंद घ्यावी.

जलशुध्दीकरणामुळे उदया शनिवार दिनांक 17/06/2023 रोजी सायंकाळी पाणी पुरवठा होणार नाही. तसेच रविवार दिनांक 18/06/2023 रोजी सकाळचा होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी. नागरीकांनी उपल्बध पाण्याचा वापर काटकसरीने करून नगरपरिषदेस सहकार्य करावे.



