भक्तिमय वातावरणात लोणंद नगरीत पालखी सोहळा विसावला
लोणंद नगरपंचायतीच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत

लोणंद । पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात आपल्या पाच दिवसांच्या प्रवासासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दूपारी दिड वाजता टाळ मृदुंगाच्या गजरात मोठ्या भक्तिमय वातावरणात दाखल झाला. निरा नदीवरील प्रसिद्ध दत्तघाट येथे माऊलींच्या पादूकांना निरा स्नान घातल्यानंतर माऊलींच्या रथाचे स्वागत निरा नदीकाठावरील पाडेगाव येथे सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आल्यानंतर पालखी सोहळा पाच वाजण्याच्या सुमारास लोणंद शहरात दाखल झाला. लोणंद येथील नगरपंचायत चौकात नगरपंचायतीच्या वतीने माऊलींचे भव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी लोणंदच्या नगराध्यक्षा मधुमती पलंगे-गालिंदे , उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके-पाटील, मुख्याधिकारी दतात्रय गायकवाड, नगरसेवक आनंदराव शेळके,रविंद्र क्षीरसागर, भरत शेळके ,सचिन शेळके, गणीभाई कच्छी, प्रविण व्हावळ, सुप्रिया शेळके, सीमा खरात, राशिदा इनामदार, भरत बोडरे, . सागर शेळके दिपाली निलेश शेळके, आसिया बागवान, तृप्ती घाडगे, राजश्री शेळके, दिपाली संदीप शेळके, ज्योती डोनीकर , तसेच डॉक्टर नितीन सावंत, ॲड. गजेंद्र मुसळे, रवींद्र डोईफोडे ,राजेंद्र शेळके, सर्फराज बागवान, हर्षवर्धन शेळके, तारीक बागवान, नगरपंचायत कार्यालय अधीक्षक शंकर शेळके, सागर मोटे, रोहीत निंबाळकर, रामदास तुपे, पोपटराव क्षीरसागर, विजय बनकर, बाळकृष्ण भिसे , वैजनाथ गाडे, श्रद्धा गर्जे, निशा फडतरे ,शाहीन सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.
पालखी सोहळा तानाजी चौकात पोहचल्यानंतर माऊलींची पालखी रथातून उतरवून खांद्यावर घेऊन लोणंदकर ग्रामस्थांनी वाजतगाजत साडेपाच वाजण्याच्या सुमारास पालखीतळावर पोहचवली. पालखी तळावर सर्व पालख्या गोलाकार उभ्या केल्यानंतर चोपदारांनी दंड उंचावल्यानंतर सर्व दिंड्या शिस्तीत ऊभ्या राहील्या यानंतर वारकऱ्यांना सूचना देण्यात आल्यानंतर सायंकाळची समाज आरती होऊन लोणंद मुक्कामी पालखी सोहळा विसावला. यानंतर पादुकांचे दर्शन घेण्यासाठी सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर पासून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली.
पालखी सोहळ्यासाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभारी बंदोबस्त अधिकारी अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर तसेच सहाय्यक बंदोबस्त अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण राहुल धस, लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर यांनी निरा विसावा पासून लोणंद अशी चोख बंदोबस्ताची व्यवस्था केली. तसेच संपूर्ण पालखी काळात वेगवेगळ्या पथकांद्वारे लोणंद , फलटण व बरड पर्यंतच्या पालखी बंदोबस्ताचे नियोजन सातारा पोलीसांकडून करण्यात आले आहे.