व्हेल मासा उलटी तस्करी : महाबळेश्वरच्या माजी नगरसेवकासह चाैघे जण वनविभागाच्या ताब्यात

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
महाबळेश्वर येथे व्हेलं माशाच्या उलटीच्या तस्करी प्रकरणी महाबळेश्वर नगरपरिषदेचे माजी नगरसेवकांसह चार जणांना सातारा वनविभागाने अटक केली. मध्यरात्री 1 वाजता सदरची कारवाई वनविभाने केली असून सर्व संशयित आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, महाबळेश्वरचे माजी नगरसेवक प्रकाश पाटील यांच्यासह संतोष खुशालचंद्र जैन (रा. निसर्ग विहार, रत्नागिरी, जि. रत्नागिरी), संजय जयराम सुर्वे (रा. मेढा, ता. जावळी), अनिल अर्जुन ओंबळे (रा. बोंडारवाडी, ता. जावळी) या संशयित चार जणांना व्हेलं माशाच्या तस्करी प्रकरणी सातारा वन विभागाने ताब्यात घेतले आहे.
उपवनसंरक्षक श्रीमती भारद्वाज सहाय्यक वनसंरक्षक झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर येथील रेंज फॉरेस्ट ऑफिसर महांगडे यांनी ही धडाकेबाज कारवाई केली. रात्री एक वाजता व्हेल माशाचे तसकरीचा मुद्देमाल मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकून जप्त करण्यात आलेला आहे. या प्रकरणात महाबळेश्वरच्या माजी नगरसेवक प्रकाश रामचंद्र पाटील याच्यासह एकूण चार जण अटक करण्यात आली आहे. त्यांना आज दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून सांगण्यात आली.



