महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्या संकल्पनेतील काँग्रेस केव्हाच संपली : आ. शिवेंद्रराजे भोसले

सातारा | काॅंग्रेस आणि राहूल गांधी यांच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान केला जात आहे. देशाच्या स्वातंत्र्यात सावकरकरांचे जे योगदान आहे, त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. महापुरूषाचा वेगवेगळ्या पध्दतीने अपमान केला जात आहे आणि आपलं महत्व वाढवलं जात आहे. यामुळंच काॅंग्रेसची देशात वाताहत झाली, लोकांचा काॅंग्रेसवरील विश्वास उडाला. महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्या संकल्पनेतील काँग्रेस केव्हाच संपली असल्याचा टोला आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले.
साताऱ्यात आज सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. तालीम संघ मैदान येथून या यात्रेला आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वखालील सुरुवात करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते या यात्रेत सहभागी होते. या यात्रे दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
आ. शिवेंद्रराजे म्हणाले, महापुरूषाची बदनामी करण्यामुळे योग्यवेळी मताच्या स्वरूपात दणका बसेल. देशप्रेम, धर्माबद्दल ज्यांना प्रेम, निष्ठा आहे, ते ही बदनामी सहन करणार नाहीत. सातारा जिल्हा, जावळी व सातारा मतदार संघातील जनतेच्या वतीने राहूल गांधी व काॅंग्रेसचा निषेध व्यक्त करत आहे.