साताऱ्याचा पुढचा खासदार कोण? (भाग-2) : जिल्ह्यात कोणा- कोणाची नावे चर्चेत..?

– विशाल वामनराव पाटील
सातारा जिल्हा लोकसभा मतदार संघ सहा विधानसभा मतदार संघात आणि दोन विभात विभागला जातो. यामध्ये कराड व सातारा असे हे दोन विभाग असून नेहमीच खासदार कराडचा कि साताऱ्याचा असा सवाल उपस्थित होत असतो. ‘हॅलो न्यूज’ च्या माध्यमातून साताऱ्याचा पुढचा खासदार कोण या लेखमालिकेतून काही नावे चर्चेत आम्ही ठेवली आहेत. तसेच तुम्हांला अजून काय वाटते तेही तुम्ही पोलमध्ये सांगावे.
पुढचा खासदार ठरविताना सातारा लोकसभा मतदार संघातून कराड विभागातून सध्या महाविकास आघाडीतून चर्चेत सर्वात पुढे नाव आहे, ते म्हणजे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील आणि माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण, त्यानंतर विद्यमान खासदारांचे चिरंजीव सारंग पाटील, अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांना काॅंग्रेसचा उमेदवार असल्यास तरूण चेहरा म्हणून पाहिले जावू शकते. तर महायुतीतून डाॅ. सुरेश भोसले यांचे नाव आघाडीवर आहे, परंतु सध्यातरी डाॅ. भोसले राजकारण, खासदारकी याविषयापासून दूर आहेत. त्यानंतर माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी एकदा लोकसभेला शिवसेनेतून नशीब अजमावले होते. परंतु, आजची परिस्थिती बदलली असून यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.
सातारा जिल्ह्याचा पुढचा खासदार कोण?(हँलो न्यूज पोल- 2024)
खालील फेसबुक लिंकवर आपलं मत नोंदवा
https://www.facebook.com/groups/1728379947631362/permalink/1728397130962977/?mibextid=Nif5oz
खालील युट्यूब लिंकवर आपलं मत नोंदवा
https://youtube.com/@vishal_patil?si=4-CsPL6XqCuJ1wFN
सातारा विभागातून भाजपचे राज्यसभा खासदार छ. उदयनराजे भोसले यांचे नाव महायुतीतून आघाडीवर आहे. त्यासोबत आता अजित पवार गट युतीत सहभागी झाला असला तरी सातारा लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी (अजित पवार गटाला) मागितला जाईल. तेव्हा अजित पवार गटातून सध्या आघाडीवर सातारा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील आणि विधानसभेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक- निंबाळकर हे आहेत. भाजप आणि शिवसेना युती असताना सातारा लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेला सोडला जात होता. त्यामुळे आज भाजपसोबत शिंदे गट असल्याने निवडणुकीत शिवसेना शिंदे गटातून पुरूषोत्तम जाधव हे नाव पूर्वी निवडणूक लढल्याने चर्चेत येत आहे. परंतु, पूर्वी ज्या पध्दतीने पुरूषोत्तम जाधव यांनी लोकसभा मतदार संघ पिंजून काढला होता, त्यामध्ये कुठेतरी खंड पडलेला दिसतोय. तरीही शिंदे गटाकडून उमेदवारीसाठी श्री. जाधव यांनाच सर्वाधिक पसंती दिली जावू शकते. (उद्या भाग 3 मध्ये- कोणला पसंती कोण किती खोलात)