ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यसातारा

साताऱ्याचा पुढचा खासदार कोण? (भाग- 3) : संघर्षातील तरूण नवा चेहरा की केवळ राजकीय वारसदार

– विशाल वामनराव पाटील
सातारा लोकसभा मतदार संघात सध्या 10 चेहरे चर्चेत आणले असले तरी यातील काही चेहरे हे परिस्थितीनुसार निवडणुक रिंगणात उतरतील. त्यामध्ये कोणाला राजकीय वारसा, कोणाला पक्षामुळे संधी मिळू शकते. कोण विजयाच्या गणितांची बेरीज करण्यामुळे पुढे- मागे सरकेल, यांची सध्या लोकाच्यांत चर्चा सुरू आहे. लोसभेला नवीन चेहऱ्याला सातारा जिल्ह्यात संधी मिळून पुढचा खासदार तरूण, राजकीय वारसदार असणार आहे. परंतु, त्यासोबत लोकांच्यात मिसळणारा संघर्षातील उमेदवार असावा असा विचार मतदार करू शकतो. तरूण नव्या चेहऱ्यांचा विचार करताना कराड भागातून अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, सारंग पाटील, नरेंद्र पाटील आणि सातारा विभातून केवळ एकमेव नितीन पाटील यांचा विचार होवू शकतो.

सारंग श्रीनिवास पाटील
सातारा लोकसभा मतदार संघात तरूण चेहऱ्याची खासदारकीला गरज आहे. कारण खासदार श्रीनिवास पाटील यांनी मागील निवडणुकीतच राजकारणातून थांबण्याचे संकेत दिले होते. परंतु, मित्राच्या (शरद पवार) शब्दाखातर निवडणूक लढवली. आता त्याच्याकडून वारसदार आणि अभ्यासू म्हणून सारंग पाटील यांना मैदानात उतरविण्याची तयारी सुरू झाली आहे. सारंग पाटील यांनी पदवीधर निवडणुकीच्या माध्यमातून मोठे काम केले आहे. तसेच खासदारांचा सुपुत्र ही ओळख संपूर्ण जिल्ह्याला आहे. तेव्हा त्यांचाही विचार होवू शकतो. मात्र बाप तो बाप होता है, आैर बेटा बेटा होता है. त्यामुळे त्यांचा लोकसभा मतदार संघात कस लागू शकतो. याठिकाणी राष्ट्रवादीतून (शरद पवार) तरूण नवा चेहरा म्हणून सारंग पाटील यांचाच विचार होवू शकतो.

ॲड. उदयसिंह विलासराव पाटील
कराड दक्षिण मतदार संघात डाॅ. अतुल भोसले यांना फाईट देण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाच पुन्हा दक्षिणेत विधानसभेला उतरावे लागणार आहे. तर ऐनवेळेला मागील निवडणुकीत आ. पृथ्वीराज चव्हाणांना अगदी शरद पवार यांच्यापासून मागणी झाली, तीच परिस्थिती पुन्हा उदभवू शकते. अशावेळी दक्षिण विधानसभा राखण्यासाठी काॅंग्रेस खेळी करून लोकसभेला ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांना तरूण चेहरा म्हणून उतरवू शकते. कारण स्व. विलासराव पाटील (काका) यांचा जिल्हाभर पक्षीय राजकारण सोडून संपर्क होता. खा. छ. उदयनराजे भोसले काकांना मानणारे होते. तर पालकमंत्री शंभूराज देसाई साडूसाठी राजकारण बाजूला ठेवून धावत येतील. कराड दक्षिणेत आणि उत्तरेत स्वतः चा काॅंग्रेसचा (काॅग्रेस- उंडाळकरांचा) गट आहे. राष्ट्रवादीनेच ॲड.. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांना रिंगणात उतरवल्यास आ. बाळासाहेब पाटील यांना आघाडी धर्म पाळवा लागेल. तसेच भाजपची काहीशी ताकद ॲड.. उडाळकर यांच्यासोबत असल्याचे यापूर्वी बाजार समितीच्या निवडणुकीत पाहिले आहे. तेव्हा काकांच्या सुपुत्रासाठी काॅंग्रेसच्या हात चिन्हावर विचार होवू शकतो. उदयसिंह पाटील यांनी विधानसभा, जिल्हा बॅंकेत मोठा संघर्ष केला. कराड बाजार समितीत त्यांनी विजय मिळवत जिल्हा नव्हे तर राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. काॅंग्रेस विचार काकांनी अखेरच्या श्वासापर्यंत सोडला नाही अन् आता मुलगा म्हणून ॲड. पाटील यांनी सुध्दा काॅंग्रेससोबत दोन पाऊले मागे येवून विचार जोपसला आहे. संघर्षातील चर्चेतील तरूण चेहरा म्हणून त्यांची जिल्हाभर अोळख आहे. अशा परिस्थितीत ॲड. पाटील यांना उमेदवारी ही काॅंग्रेसला मतदार संघ सोडला तर मिळणार आहे.

सातारा जिल्ह्याचा पुढचा खासदार कोण?(हँलो न्यूज पोल- 2024)
खालील फेसबुक लिंकवर आपलं मत नोंदवा
https://www.facebook.com/groups/1728379947631362/permalink/1728397130962977/?mibextid=Nif5oz
खालील युट्यूब लिंकवर आपलं मत नोंदवा
https://youtube.com/@vishal_patil?si=4-CsPL6XqCuJ1wFN

नरेंद्र आण्णासाहेब पाटील
माथाडीचे नेते व भाजपचे नेते नरेंद्र पाटील यांनी यापूर्वी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लोकसभा लढवली असून मोठी मते मिळवली होती. तसेच आण्णासाहेब पाटील अर्थिक महामंडळाच्या माध्यमातून मोठे काम केले आहे. तरीही लोकसंपर्क मोठा वाढवा लागणार असून कराड, पाटण भागातून मोठी मते मिळवू शकतात. भाजपची ताकद आज जिल्ह्यात वरचढ आहे, परंतु नरेंद्र पाटील यांनी जिल्हाभर केवळ निवडणुकीच्या तोंडावर नाही तर आतापासून तळ ठोकणे गरजेचे आहे. अशावेळी जनसंपर्क महत्वाचा असून फोडाफोडी, गटातटाचे राजकारण विजयाजवळ नेणार की दूर नेणार यांचे गणित ठरणार आहे.

नितीन लक्ष्मणराव पाटील
सातारा विभागातून विचार करायचा झाला तर एकमेव सातारा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचा विचार होवू शकतो. नितीन पाटील यांना राजकीय वारसा मोठा असून वडिल खासदार होते. भाऊ विद्यमान आमदार आणि स्वतः जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष त्यामुळे संघर्ष न करताच वारसा हक्काने अनेक पदे मिळाली आहेत. परंतु, वारसा मिळाला असला तरी मतदारसंघ बांधून ठेवणे, मतदार जपणे आणि विशेषःत शेतकऱ्यांसाठी साखर कारखान्याच्या माध्यमातून नितीन पाटील यांचे काम मोठे आहे. राष्ट्रवादीतून (अजित पवार) लोकसभेला विचार होवू शकतो, त्यादृष्टीने पाऊलेही टाकली जात आहेत. ऐनवेळेला पक्षीय चिन्हांशी तडजोड झाल्यास भाजपाकडून तरूण नवा चेहरा म्हणूनही नितीन पाटील यांचा विचार सातारा विभागातून होवू शकतो.

कुठे कशी परिस्थिती
खरंतरं या सर्व परिस्थितीत तरूण नवा चेहरा म्हणून सारंग पाटील, नितीन पाटील राष्ट्रवादीतून दोन उमेदवार पुढे आले असले तरी दोन्ही गटाकडून उमेदवारी जाहीर केल्यास त्याचा फायदा भाजपाला होणार हे स्पष्ट आहे. परंतु, दुसरीकडे ऐनवेळी शरद पवार यांची खेळीतून मतदार संघात काॅंग्रेसच्या विचारचा अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर हे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले जावू शकतात. भाजपाकडून नरेंद्र पाटील यांचा नवा चेहरा म्हणून विचार होवू शकतो. तर आ. मकरंद पाटील आणि रामराजे नाईक- निंबाळकर नितीन पाटील यांच्यासाठी पक्षचिन्ह यांच्याशी तडजोड करतील. त्यामुळे नरेंद्र पाटील यांचा कराड भागातून तर सातारा भागातून भाजपाला ऐनवेळी नितीन पाटील हाही उमेदवार म्हणून पर्याय समोर असणार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker