कोकणताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

एवढा मोठा कोण हा शंभूराज? : मंत्री शंभूराज देसाईंचा सवाल

सातारा | उध्दव ठाकरेना थेट संपर्क करणारा एवढा मोठा दुसरा शंभूराज कोण?. आम्ही 25 वर्षे उध्दव ठाकरेंसोबत होतो, तरी आम्हांला थेट पोहचण्यात अडचणी येत होत्या. मग एवढा मोठा कोण हा शंभूराज आहे, ज्याचा संपर्क थेट उध्दव ठाकरेंशी झाला. विनायक राऊत याच वक्तव्य खोट आहे. त्यामुळे त्यांनी कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी हा दावा केला. परंतु मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.

मंत्री शंभूराज देसाई यांच्या नोटीसीनंतर आता खासदार विनायक राऊत यांनी माध्यमासमोर खुलासा केला. मी मंत्री शंभूराज देसाई यांच्याबाबत नाही तर दुसऱ्या शंभूराज यांच्याबाबत बोलल्याचे म्हटले होते. त्यावर आता शंभूराज देसाई सातारा येथे माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी कायदेशीर नोटीस दिली होती. आज त्यांनी मी शंभूराज देसाई यांच्याबाबत बोललो नाही. दुसरे शंभूराज आहेत, जे उध्दव ठाकरे आणि आमच्या संपर्कात आहे. शिंदे साहेबांच्या सोबत मी शंभूराज देसाई सोडलो, तर दुसरा कुठलाही शंभूराज नाही.

शिवसेना खासदार विनायक राऊत शंभूराज देसाई
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शंभूराज देसाई आमच्या संपर्कात आहेत, अस वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांनी शंभूराज म्हणतायंत आमची घुसमट होतेय, शिंदे साहेबांच्या सोबत. आता आम्हाला तुमच्यासोबत यायचं आहे, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर या संदर्भातील पुरावे समोर आणावेत. अन्यथा दोन दिवसात तुमचं विधान मागे घ्या, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले होते. तसेच या संदर्भात खा. विनायक राऊत यांना कायदेशीर नोटीसही देण्यात आली होती. परंतु यामध्ये मंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार विनायक राऊत यांना शिवसेना खासदार म्हटले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker