अखेर हवाई सुंदरीचे स्वप्न सत्यात : पाच वेळा अपयश तरी विंगच्या साक्षीने जिद्द सोडली नाही

कराड | इतरापेक्षा वेगळे करण्याच्या जिद्दीतून येथील सर्वसामान्य कुंटूबातल्या 21 वर्षीय साक्षी मोरे या युवतीने हवाई सुंदरीचे स्वप्न सत्यात उतरवले. पाच वेळा अपयश आले. तरीही तिने जिद्द सोडली नाही. सहाव्यांदा यश मिळवताना दिल्लीचा हवाई प्रवास निश्चित केला. गुडगांव (दिल्ली) येथे विमानसेवेत रूजू होणार असून तिच्या यशाचे आता कौतुक होत आहे.
आत्मविश्वास अणि जिद्दीशिवाय कोणतेही पाठबळ नसताना साक्षीने मिळेवलेले यश खरोखरच वाखाण्याजोगे ठरले आहे. घरच्या बेताच्या परस्थिती तिने येथील तारांगण विद्यालयात प्राथमीक अणि माध्यमीक शिक्षण घेतले. कराडला वेणुताई चव्हाण येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतले. इयत्ता 12 वी नंतर फ्रँकफीन दोन वर्षाचा कोर्स केला. त्यानंतर कोरोना आला, त्यात दोन वर्षे गेली. कोरोनात पुणेच्या एका खाजगी हॅाटेलात नोकरी केली. त्यानंतर गत मार्चमध्ये तिने ऐअर होस्टेज पदासाठी परिक्षा दिली. या परिक्षेत 573 मुलीमध्ये तीनच मुलींची निवड झाली. त्यात तिचे नाव होते. निवडीचे पत्र मेलद्वारे तिला मिळताच कुटूंबाचा आनंद द्वीगुणीत झाला. तिची हवाई सफर आता निश्चित झाली आहे. लवकरच गुडगांव (दिल्ली) येथे विमानसेवत ऐअर होस्टेस म्हणून ती रूजू होणार आहे.
कराडच्या जणकल्याण पतसंस्थेचे साक्षीला अर्थिक सहकार्य लाभले. वडील विजय मोरे त्याच संस्थेत वाहनचालक म्हणून कार्यरत आहेत. तर आई रूपाली गृहिणी आहे. साक्षी त्याची एकुलती एक मुलगी आहे. एकाच मुलीवर कुंटूबनियोजन शस्त्रक्रीया करणारे गावात ते पहिले कुंटूब आहे. कन्येच्या यशाने कुटूंब भाराऊन गेले आहे. संगणक परिचारिका शैलजा पाटील व सचिन यादव, प्रियांका यादव, प्रविण यादव, संध्या यादव यासह आजी- आजोबाचे मार्गदर्शन मिळाल्याचे साक्षी आवर्जून सांगते.