डोंगरात रात्रीचा खेळ : तीन पोलिस पाटलांच्या मदतीने 4 चोरटे उंब्रज पोलिसांच्या ताब्यात तिघे फरार
कराड | मध्यरात्री 2. 45 वाजण्याच्या सुमारास सडावाघापूर येथिल सुझलॉन कंपनीचे साईटवरील कंपनीच्या लोकांवर कुऱ्हाड उघारून पवनचक्कीची काॅपर 7 ते 8 जणांच्या टोळीने चोरून नेली होती. भयभीत झालेल्या लोकांतील संतोष मुळीक याने 112 नंबरला डायल करत पोलिसांना माहिती दिली. सदरील माहिती उंब्रज पोलिसांना मिळताच पोलिस आणि पोलिस पाटील टीमने रात्रीतच संशयित आरोपींचा शोध घेत 15 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात चाैघांना अटक करण्यात आली असून तिघे फरार झाले आहेत. यामध्ये अनिल लक्ष्मण पवार, सुरेश बडू निकम (दोघेही रा. म्हारखंड ता. पाटण जि. सातारा), दादासो बळीराम सपकाळ (रा. बागलेवाडी ता. पाटण जि. सातारा), प्रकाश गुलाबराव जाधव (रा. कळंबे रा. पाटण जि. सातारा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जांभेकरवाडी (ता. पाटण) येथे मध्यरात्री 2. 45 वाजण्याच्या सुमारास सडावाघापूर येथिल सुझलॉन कंपनीचे साईटवरील कंपनीच्या सुपरवायझर पवनचक्की परिसरामध्ये पेट्रोलींग करीत असताना. त्यांना कंपनीचे इंजिनिअर यांचा फोन आला की, एस 96 या मशीनची कनेक्टीव्हीटी गेलेली आहे. पेट्रोलिंग करणाऱ्यांनी तात्काळ मशीन जवळ जावून पाहिले असता, त्यांना कॉपर केबल कट केलेली दिसल्याने त्यांनी कॉपर केबलचा शोध घेण्यास सुरूवात केली. या दरम्यान, पहाटे 3.30 वा. चे सुमारास सदर ठिकाणचे बाजूस असले ओढ्यामध्ये टॉवरची कट केलेली केबल 7 ते 8 इसम उचलून घेवून जात असताना दिसल्याने त्यांनी त्यांना हटकण्यास सुरूवात केली. तेव्हा संशयित आरोपी कुऱ्हाड उघारून अंगावर धावून आलेने ते सर्वजण भयभित झाले अन् माघारी फिरले. त्यानंतर संतोष मुळीक यांनी 112 ला डायल केला. तसेच उंब्रज पोलीस स्टेशनला फोन करून सदरची घटना पोलीसांना सांगितल्याने लागलीच सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांनी पोलीस टीम तयार करून पसार झालेले आरोपीचा शोध घेणे कामी योग्य सुचना देवून मार्गदर्शन केले. पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, पो. हवा. सचिन जगताप, पो. हवा, संजय धुमाळ, पो. कॉ. निलेश पवार तसेच राहुल पुजारी पोलीस पाटील ढोरोशी, अधिकराव पवार पोलीस पाटील जळव, विजय मारुती कदम पोलीस पाटील जांभेकरवाडी यांनी गावातील पोलीस मित्र सोबत घेवून येवून त्यांचे सहकार्याने पाळून गेले. आरोपीचा शोध घेत असताना जवळ खिंडीजवळ टेम्पो ट्रॅव्हलर क्र. (एम एच- 12 क्युजी 3400) ही उभी असलेली. त्यावेळी सदर ठिकाणी एक आरोपी दबा धरुन बसलेला दिसलेने त्यास ताब्यात घेवून इतर पळून गेले. त्यानंतर काही आरोपींचा शोध रात्रीचे वेळी घेवून त्यांना ताब्यात घेण्यात आले. या आरोपींकडून टेम्पो ट्रॅव्हलर, कॉपर वायरचे तुकडे, कुऱ्हाड, लाकडी दांडके, वायर कटर यांचे सह एकूण 15 लाख 40 हजार रुपये किमतीचा माल हस्तगत करणेत आला. सदरची टोळी पोलिस पाटलांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सातारा समीर शेख साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक आॅचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, पो. हवा. सचिन जगताप, पो हवा संजय धुमाळ, पो. पो. कॉ. निलेश पवार, तसेच राहुल पुजारी पोलीस पाटील ढोराशी, अधिकराव पवार पोलीस पाटील जळव, विजय मारुती कदम पोलीस पाटील जांभेकरवाडी तसेच पोलीस मित्र यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे हे करीत आहेत.