सातारा जिल्ह्याला येलो अलर्ट : जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

सातारा | बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होताच राज्याच्या अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. मॉन्सून सक्रिय झाल्याने आज (ता. 17) कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा आहे. सातारा जिल्ह्याला आज येलो अलर्ट दिला असल्याने पावसाची जोरदार हजेरी लागणार आहे.
बंगालच्या उपसागरात उत्तर ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाब पट्ट्याचा पश्चिम भाग सर्वसाधारण स्थितीत असून, पूर्व भाग दक्षिणेकडे आला आहे. साताऱ्यात गेल्या दोन दिवसापासून कोयना, महाबळेश्वर सह डोंगर भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली असून आता त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
16 Jul:पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता असून कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल
मोसमात पहिल्यांदाच मराठवाड्यातही मुसळधारचा इशारा.
आज कोकण व विदर्भात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता.चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस
Must see IMD Updates pic.twitter.com/aupDR4jOMG— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 16, 2023
कोकणातील, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. विदर्भाच्या उर्वरित भाग, नांदेड जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.