ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यशैक्षणिकसातारा

ब्रिलियंटच्या 10 विद्यार्थ्याचे होमी भाभा परीक्षेत यश

कराड :- श्रीमती सिंधुताई शिक्षण प्रसारक संस्था मलकापूर संचलित, ब्रिलियंट अकॅडमी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या ब्रिलियंट क्लास कराडच्या 27 विद्यार्थ्यांनी 9 वी मध्ये होणाऱ्या होमी भाभा या परीक्षेत यश संपादित केले होते. या विद्यार्थ्यांपैकी स्टेज २ प्रॅक्टिकल व तोंडी परीक्षेत १० विद्यार्थ्यांनी यश संपादित केले आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल, संस्थापक, अध्यक्ष, कॉलेज च्या मुख्याध्यापिका, इतर सर्व शिक्षक यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे. डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा १९८१ पासून ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशनद्वारे आयोजित केली जाते. या अद्वितीय चार टप्प्यातील स्पर्धेचे उद्दीष्ट तरुण वैज्ञानिकांमधील निरीक्षण कौशल्य विकासासह कुतूहल, समस्येचे निराकरण करण्याची वृत्ती वाढविणे आहे, हि परीक्षा फक्त सहावी आणि नववी इयत्तेत शिकणारे विद्यार्थी देऊ शकतात, हि परीक्षा ४ स्टेज मध्ये होते पहिली स्टेज हि लेखी परीक्षा असते. दुसरी स्टेज प्रॅक्टिकल परीक्षा, तिसरी स्टेज ऍक्शन रिसर्च सादर करणे व चौथी स्टेज मुलाखत व शेवटी बक्षीस वितरण अशी असते. या परीक्षेची तयारी करवून घेणारा हा एकमेव क्लास आहे.

राज्य व राष्ट्रीय पातळीवर दैदीप्यमान निकालाची परंपरा असणाऱ्या, कराडमध्ये शिकणाऱ्या, कराड व परिसरातील खेडोपड्यातील विद्यार्थ्याचे आय आय टी, एन आय टी, आय आय एस ई आर, एस पी ए (आर्किटेक्चर मधील सर्वोच्च कॉलेज ), ए आय आय एम्स एस, एन डी ए, महाराष्ट्रातील सर्वोत्तम गव्हर्नमेंट मेडिकल व इंजिनीरिंग आर्किटेक्चर कॉलेज मध्ये प्रवेश मिळवून देण्याची परंपरा असणाऱ्या ब्रिलियंट या नामांकित व दर्जेदार शिक्षणाची परंपरा असणाऱ्या, जेईई २०२५ या परीक्षेत ९९.९३३ पर्सेन्टाइल सह सातारा जिल्हा प्रथम क्रमांत मिळवून देणाऱ्या कॉलेज ने ब्रिलियंट क्लास कराड च्या माध्यमातून होमी भाभा या नामांकित परीक्षेत 27 विद्यार्थ्याना यश मिळवून देऊन स्वतःची उच्चतम शैक्षणिक पातळी पुन्हा एकदा सिद्ध केली आहेच स्टेज २ मध्ये पुढील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे, त्यामध्ये आईशा अबिद मनेर, बिलाल शोएब काझी, आदित्य वैभव कदम, अनुष्का अनिल कंक, पूर्व पवन मेहत्रे, आयुष सचिन पाटील, दिव्यांका दिग्विजय पाटील, आदिती राहुल जडगे,शर्वरी प्रभाकर ठोंबरे, रणवीर श्रीकांत सूर्यवंशी ई. विद्यार्थ्यांनी स्टेज २ हि परीक्षा पास केली आहे.

कराडमध्ये इंग्लिश मिडीयम विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप, होमी भाभा व अन्य स्पर्धा परीक्षाची तयारी करून घेणारी ही एकमेव शाळा आहे, त्यांच बरोबर सेमि माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस, स्कॉलरशिप, बिडीएस मंथन ई. परीक्षाची उत्तम तयारी या ठिकाणी होते. पुढच्या स्टेज साठी पात्र विद्यार्थ्याची प्रोजेक्ट व तोंडी परीक्षेची तयारी सुरू आहे, कोणाला या परीक्षेविषयी मोफत मार्गदर्शन घ्यायचे असेल तर ब्रिलियंट ज्युनियर कॉलेज शी संपर्क साधू शकतात असे, आवाहन संस्थेच्या संचालक मंडळाने केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker