क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

ट्रकचे टायर चोरणाऱ्या 3 युवकांना अटक : उंब्रज पोलिसांची कारवाई

कराड:- कळंत्रेवाडी येथील एका ट्रान्सपोर्टचे गोडावून फोडून ट्रकचे टायर चोरणाऱ्या तीन युवकांना उंब्रज पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासात जेरबंद केले. गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, गौरव दिपक सुतार राहणार उंब्रज, तालुका कराड हे मौजे कळंत्रेवाडी येथील सिद्धिविनायक ट्रान्सपोर्ट च्या गोडाऊन मध्ये कामाला आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, MRF कंपनीचे भारत बेंज ट्रकचे रिमोट केलेले असा एकूण ६०,००० हजार रुपये किमतीचे ४ टायर चोरट्यांनी गोडाऊनच्या शटरचे छनी व हातोड्याच्या साह्याने कुलूप तोडून चोरून नेले आहेत. ही बाब लक्षात येताच दि.०३/०३/२०२५ रोजी फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठून सदरची घटना मध्यरात्री झाल्याचे सांगितले. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तात्काळ उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रविंद्र भोरे यांनी पोलिसअंमलदार व पोलीस स्टेशन मधील अधिकारी यांना पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करताना अज्ञात आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या.

पेट्रोलिंग करत असताना उंब्रज गावच्या हद्दीत रणजीत १) सोमनाथ चव्हाण (वय २२ वर्ष), २)संकेत संतोष चव्हाण (वय १९ वर्ष), ३) अमोल रमेश चव्हाण (वय १९ वर्ष, सर्व राहणार लक्ष्मी नगर, उंब्रज ता. कराड) येथील रहिवासी असून, ते संशयितरित्या आढळून आले असता, त्यांच्याजवळ गुन्ह्याची विचारपूस केली असता त्यांनी टायर चोरल्याची कबुली दिली. त्यामुळे गुनह्याच्या तपासासाठी त्यांना अटक करून गुन्ह्यात चोरलेला सर्व मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. तरी सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले हे करीत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close