kota acadamy karad
कृषीकोल्हापूरताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेब्रेकिंगसांगलीसातारासामाजिकहवामान

साताऱ्यात पाटणला पूल, बंधारे पाण्याखाली, कोयना- नवजा रस्ता खचला

सातारा जिल्ह्याला आजही रेड अलर्ट

पर्यटन स्थळे धबधब्यावर जाण्यास मनाई

सातारा जिल्ह्याला आजही रेड अलर्ट असून पश्चिम घाट परिसरात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील पर्यटन स्थळे तसेच धबधबे या ठिकाणी जाण्यासाठी निर्बंध घातले असल्याचे माहिती उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांनी दिली आहे. त्यामुळे पाटण तालुक्यातील डोंगर पठारावर तसेच कोयना धरण परिसर ओझर्डे धबधबा सडा वाघापूर पठार या सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांना निर्बंध घातले आहेत.

साताऱ्यात पश्चिम घाट परिसरात मुसळधार पाऊस

कराड, पाटणसाठी 28 जवानांची एनडीआरएफ टीम दाखल

सातारा जिल्ह्याला तीन दिवसापासून रेड अलर्ट हवामान खात्याकडून दिला आहे. कराड आणि पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने 28 जवानांची एनडीआरएफ टीम दाखल झाली आहे. आपतकालीन परिस्थितीत तालुका नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रातांधिकारी अतुल म्हेत्रे यांनी आवाहन केले आहे.

संगमनगर धक्का जुना पूल पाण्याखाली

निसरे, तांबवे बंधारेही गेले पाण्याखाली

सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून विशेषता पश्चिम घाट परिसरातील अनेक भागात पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत आहे. या पावसामुळे पाटण तालुक्यातील संगमनगर धक्का जुना पूल पाण्याखाली गेला आहे. तर कोयना नदीवरील निसरे, तांबवे येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच ढेबेवाडी विभागातील महिंद पांटबंधारे प्रकल्प 100% भरला असून या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचे आदेश दिले असून आजही पाऊस मोठ्या प्रमाणावरती सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊ लागली आहे.

कोयना धरणात 36 टीएमसी पाणीसाठा

संगमनगर धक्का जुना पूल पाण्याखाली

निसरे, तांबवे बंधारेही गेले पाण्याखाली

कृष्णा कोयना नदी दुथडी भरून वाहू लागली

सातारा जिल्ह्यात पश्चिम घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून कोयना धरणात गेल्या 24 तासात 93 हजार क्युसेस पाण्याची प्रति सेकंद आवक सुरू असून धरणात 36 टीएमसी पाणीसाठा साठला आहे. कोयना नदीवरील जुना संगमनगर धक्का पूल, निसरे, तांबवे बंधारे पाण्याखाली गेले आहेत,

कोयनानगर- नवजा रस्ता खचला

कोयना–नवजा मुख्य मार्गावरील कामरगाव येथील पाबळनाला परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्याचा भाग खचल्याने या मार्गावरील वाहतूक तातडीने बंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे नवजा परिसराचा एकमेव संपर्कमार्ग बंद पडल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. रस्ता खचल्याची माहिती मिळताच मंडलाधिकारी संजय जंगम तसेच महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीची पाहणी करून पुढील उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.


विशेष म्हणजे, गतवर्षीही याच परिसरात रस्ता खचल्याने वाहतूक काही काळ बंद ठेवावी लागली होती. यंदा त्याच ठिकाणापासून काही अंतरावर पुन्हा रस्ता खचल्याने हा प्रश्न दरवर्षीच गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नवजा भागातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
गतवर्षी रस्ता खचल्यावर तात्पुरता पर्यायी मार्ग तयार करण्यात आला होता. मात्र त्यावर मलबा आल्याने तो सध्या बंद आहे. हा पर्यायी मार्ग तातडीने खुला केल्यास काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होऊ शकते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close