Hello News 2026 Ganpati Arati Book
कोल्हापूरताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनब्रेकिंगराज्यसांगलीसाताराहवामान

पाटण तालुक्याला पावसाने झोडपले, उद्या शाळांना सुट्टी, चारजण जखमी

सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचा तातडीचा आदेश

सातारा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट

सातारा जिल्ह्यातील पाटण, वाई, जावली, महाबळेश्वर आणि सातारा या पाच तालुक्यांना सुट्टी जाहीर

कोयना धरणात 24 तासात 6.76 टीएमसी पाणीसाठा

खोडशी बंधाऱ्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू

सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरात मुसळधार पाऊस पडत असून कोयना धरणात गेल्या चोवीस तासात पावणेसात टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. तर कराड तालुक्यातील खोडशी बंधाऱ्याच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून कोयना- कृष्णा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होवू लागली आहे. यांचाच आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी

पाटण तालुक्यात मुसधार पाऊस, घरावर झाड कोसळले

ढाणकला दोन महिला तर हेळवाकला वृध्द दाम्पत्य जखमी 

साताऱ्यातील पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून ढाणकल आणि हेळवाक येथे घरांचे छत उडून चार जण जखमी झाले आहेत. हेळवाक येथे काही वेळापूर्वी अतिवृष्टीमुळे घरावर झाड कोसळल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत वृध्द दाम्पत्य जखमी झाले आहे. या ठिकाणी प्रातांधिकारी सोपान टोम्पे यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी दाखल झाले आहे. तर ढाणकल येथेही घरावरचा पत्रा उडून दोन महिलांना मार लागला आहे. कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू झाला असून प्रतिसेंकद 90 हजार क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे.

शांताराम बाबू गोसावी, गोकुळतर्फ हेळवाक यांचे घरावर अतिवृष्टीमुळे झाड कोसळून घराच्या संपूर्ण छताचे नुकसान झाले आहे.
शांताराम बाबू गोसावी व लक्ष्मीबाई शांताराम गोसावी यांना सदर घटनेत अल्प दुखापत झाले कारणाने त्यांना गोकुळतर्फ हेळवाक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन जात आहे

Dhankal येथे तुळसाबाई पांडुरंग दवंडे व जनकाबाई बाबाजी दवंडे यांच्या घराची पडझड झाली असून त्यांचे पंचनामे केले आहेत.तसेच तुळसाबाई दवंडे यांच्या अंगावर घरावरचा पत्रा पाडल्या मुळे मुकामार लागला असून. जास्त गंभीर दुखापत नाही.

सातारा जिल्ह्याला आज रेड अलर्ट दिला असून कोयना नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. पाटण तालुक्यातील संगमनगर धक्का येथील जुना पूल पाण्याखाली गेला आहे.

पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस , तीन ठिकाणी झाडे पडली, सात जखमी

धावत्या बाईक व प्रवासी जीप वर झाड कोसळले

चाफळ–माजगाव मार्गावर चालत्या जीप गाडीवर बाभळीचे झाड कोसळले, सहाजण जखमी

तळमावले कालगाव मार्गावरही झाड पडले

सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसराला आज अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असून पाटण तालुक्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. कराड चिपळूण मार्गावर मल्हारपेठ येथे एक झाड पडून एक जण जखमी झाला आहे तर चाफळ उंब्रज मार्गावर प्रवासी घेऊन निघालेल्या चालत्या जीपवर बाभळीचे झाड पडून सहा जण जखमी झाले आहेत. तर ढेबेवाडी विभागातील गुडे काळगाव मार्गावर झाड पडल्याची घटना घडली आहे.

या दुर्घटनेत चालक सुभाष साळुंखे, वंदना योगेश चव्हाण (साजूर), पूनम शिवाजी पाटील (दाढोली), संभाजी पाटील (दाढोली), मानसिंग बाळाराम साळुंखे (चाफळ) आणि वैशाली रविंद्र पाटील (चाफळ) हे किरकोळ जखमी झाले.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close