कराडच्या नव्या सहापदरी उड्डाणपूलावर पहिला भीषण अपघात, चार मित्रांचा मृत्यू
कोल्हापूरच्या महालक्ष्मीला दर्शनाला गेलेल्या स्काॅर्पिओचा भीषण अपघात, साताऱ्यातील 4 युवक ठार तर 3 जखमी

कराड (हॅलो न्यूज) – साताऱ्यातील कराड शहराजवळ पुणे- बेंगलोर महामार्गावर नव्याने उभारलेल्या सहापदरी उड्डाणपूलावर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास स्काॅर्पिओचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 4 मित्रांचा दुर्देवी अंत झाला आहे तर तीनजण जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व युवक कोल्हापूरच्या महालक्ष्मीला दसऱ्यानिमित्ताने दर्शनाला गेले होते. दर्शनाहून परताना हा भीषण अपघात झाला आहे. अपघातातील सर्व युवक साताऱ्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव गावचे आहेत. कराड शहराजवळ उभारलेल्या नवा सहापदरी उड्डाणपूल काही दिवसापूर्वीच वाहतुकीस खुला केला असून हा पहिलाच भीषण अपघात आहे. जखमीवर कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कराडच्या नव्या उड्डाणपूलावर कोल्हापूरहून सातारच्या दिशेला जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला आहे.
अपघातात ठार झालेल्या युवकांची नांवे
1) तेजस देशमुख (चालक वय- 25 वर्षे), 2)सागर निंबाळकर (वय-23 वर्षे), 3)सुयश चिंचकर (वय-20 वर्षे), 4) रोहीत धोत्रे (वय-21 वर्षे)
जखमींची नांवे
1) ऋतुराज दुबळे (वय-21 वर्षे), 2) शंतनू शिंगाडे (वय-20 वर्षे), 3) अमन तांबोळी (वय-23 वर्षे)
स्कॉर्पिओ गाडी नंबर- MH -11- DH- 8361
ट्रक नंबर – MH-10-DT-8378
अपघाताची माहिती मिळतात कराडच्या डीवायएसपी राजश्री पाटील, कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्ष दत्तात्रय दराडे, कराड वाहतूक शाखेचे संदीप साळुंखे, संग्राम पाटील, अमृत बाबर, दस्तगीर आगा, राहुल कदम, सचिन देवकर तसेच नागरिकांनी मदत केली.



