कराड सोलर ऊर्जा
कोल्हापूरताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेबिझनेसराज्यसांगलीसातारा

जयवंतराव भोसले पतसंस्थेचे २ हजार कोटी व्यवसायाचे उद्दिष्ट : आमदार डॉ. अतुलबाबा भोसले

पतसंस्थेच्या ३३ व्या शाखेचे पेठवडगाव येथे उद्‌घाटन

कोल्हापूर (हॅलो न्यूज) :- सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेने चालू आर्थिक वर्षात २ हजार कोटी रुपयांच्या एकूण व्यवसायाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कृष्णा आर्थिक परिवारातील सर्व संस्था पारदर्शक पद्धतीने कामकाज करत असून, या संस्थांनी विश्वासाची परंपरा अखंडपणे जपली आहे, असे प्रतिपादन कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथे सहकारमहर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३३ व्या शाखेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.व्यासपीठावर पेठवडगावचे नगरसेवक गुरुप्रसाद यादव, भाजपाचे मंडल अध्यक्ष अमरसिंह पाटील, पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, उपाध्यक्ष धनाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार डॉ. भोसले पुढे म्हणाले, की गेल्या २६ वर्षांत पतसंस्थेने आपल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर मोठा नावलौकिक मिळवला आहे. ग्राहकांचा विश्वास संपादन करत संस्थेने आर्थिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या विश्वासाच्या बळावर संस्थेने विस्तार करत ३३ व्या शाखेपर्यंत मजल मारली आहे.

कृष्णा आर्थिक परिवारातील सर्व संस्था विश्वासार्हता, पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त या तत्त्वांवर काम करत आहेत. या परिवारातील कृष्णा सहकारी बँक हीदेखील एक महत्त्वाची संस्था असून, तिने बँकिंग क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कृष्णा आर्थिक परिवाराने आगामी आर्थिक वर्षासाठी एकूण ४ हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. पेठवडगाव परिसरातील नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी पतसंस्था निश्चितच प्रयत्न करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विश्वास माने, अल्पसंख्यांक सेलचे सलीम मुल्ला, मंडल सरचिटणीस राजकुमार मिठारी, पतसंस्थेचे संचालक वसीम मुल्ला, सिद्धेश्वर पाटील, शिवाजी कणसे, दिपक गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व ग्राहक उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close