Satara News पुणे- बेंगलोर महामार्गावर आईच्या समोर चिमुरडीचा मृत्यू : दोघे गंभीर जखमी

कराड (हॅलो न्यूज):- पुणे-बेंगलोर महामार्गावर मालखेड फाटा येथे झालेल्या दुचाकीच्या अपघातात तीन वर्षाच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. तर आई व चुलते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. वेदाक्षी सुजितकुमार कुंभार (वय-3 वर्षे रा. बेलवडे बुद्रुक ता. कराड) असे अपघातात मयत झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. या अपघाती मृत्यूची नोंद कराड तालुका पोलिसांत करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलवडे बुद्रुक येथील वेदाक्षी हि आई सायली सुजितकुमार कुंभार (वय-32) व चुलते अजित माणिकराव कुंभार (वय-32) यांच्यासामेत इलेक्ट्रीक दुचाकीवरून रविवारी दुपारी बेलवडेहून कासेगावच्या दिशेने निघाली होती. दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी पुणे-बेंगलोर महामार्गावरील मालखेड फाटा येथे आली असता. त्यांच्या दुचाकीची अज्ञात वाहनाला माठीमागून ठोकर बसल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक आंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
या अपघातात तिघेही गंभिर जखमी झाले, त्यांना तत्काळ उपचारासाठी कृष्णा रूग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापुर्वीच वेदाक्षी मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर आई सायली व चुलते अजित कुंभार गंभिर जखमी झाले असून त्यांच्यावर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. येथील कॉटेज हॉस्पिटल येथे वेदाक्षिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास तालुका पोलिस करीत आहेत.



