kota acadamy karad
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनराजकियराज्यसाताराहवामान

ढेबेवाडी विभागाला पावसाने झोडपले, घरांवरील पत्रे उडाले : मृणाल पाटील यांचा मदतीचा हात

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या माध्यमातून मदतीचा हात

पाटण – साताऱ्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागाला गेल्या चार दिवसापासून मुसळधार पावसाने झोडपले असून अनेक घरांवरील पत्रे उडाले आहेत. या आपत्तीच्या काळात उद्योजक महेश पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य मृणाल पाटील यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून पीडित कुटुंबांना हेल्पिंग किट (Helping Kit) द्वारे मदत उपलब्ध करून दिली आहे.

ढेबेवाडी विभागातील वरपेवाडी, एकवडेवाडी आणि सातरमधील पीडित कुटुंबांची पाहणी करून तातडीने मदत केली आहे. शासनाच्या मदतीपूर्वीच जिल्हा परिषद सदस्या मृणाल पाटील यांनी मदतीचा हात देत या पिडीत कुटुंबाना आधार दिला आहे. ढेबेवाडी जिल्हा परिषद गटात अजूनही पावसाची संततधार असून लोकांची मोठी गैरसोय होत आहे. प्रशासनही अलर्ट मोडवर असून त्याच्यासोबत पदाधिकारीही कामाला लागल्याचे यानिमित्ताने पहायला मिळत आहे.

यावेळी जि. प. सदस्या मृणाल पाटील म्हणाल्या, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली हे मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. प्रशासनही पंचानामे करण्यासाठी युध्दपातळीवर काम करत आहे. सध्या ज्या आपतीग्रस्त कुटुंबे आहेत, त्यांना धीर देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी भागाची लोकप्रतिनिधी म्हणून सदैव सोबत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close