नवरात्री उत्सव : सुपनेत 11 फूटी देवीच्या मूर्तीसमोर उभे गोल रिंगण सोहळा

– विशाल वामनराव पाटील
राज्यात नवरात्री उत्सवामुळे उत्साहाचं वातावरण असून ग्रामीण भागातही नवरात्रीचा उत्साह दिसून येत आहे. कराड तालुक्यातील सुपने येथील नावजी महाराज नवरात्र उत्सव मंडळाने आषाढी एकादशीला वारकऱ्यांची दिंडी निघाल्यानंतर आश्वाचे उभे गोल रिंगण सोहळा होत असतो, त्याचा देखावा उभारला आहे. या मंडळाने 11 फुटी आकर्षक अशी देवीची मूर्ती आणली असून ती पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत.
सुपने येथील नावजी महाराज नवरात्र उत्सव मंडळाची 1994 साली स्थापना झाली असून यंदाचे 29 वे वर्ष साजरे होत आहे. दरवर्षी धार्मिक व पर्यावरण पूरक देखावा सादर करण्याची परंपरा मंडळाने जपली आहे. तसेच या मंडळाकडून कोणत्याही प्रकारची साऊंड सिस्टीम राबवली जात नाही. चालू वर्षी मंडळाने पंढरपूरच्या विठ्ठलाला आषाढी वारी जाताना ठिकठिकाणी होत असलेल्या उभ्या गोल रिंगण सोहळ्याचा देखावा उभारला आहे. रिंगण सोहळा पाहण्यासाठी परिसरासह तालुक्यातील भाविक गर्दी करत आहेत. तसेच आकर्षक अशी 11 फूटी देवीची मूर्ती उभारली असून सजावट दिव्यभव्य अशी केलेली पहायला मिळत आहे.
या मंडळाचे अध्यक्ष दिपक पाटील, उपाध्यक्ष सुजित भोसले, सभासद शेखर पाटील, योगेश शिद्रुक, किरण पाटील, अक्षय पाटील, साैरभ पाटील, शुभम पाटील, दिलीप पाटील, अकुंश पाटील, संकेत पाटील, सुजित पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह सहकारी विशेष परिश्रम घेत आहेत.