kota acadamy karad
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसांगलीसातारा

तासवडे MIDC कोकेन प्रकरण : 5 पैकी 3 अटकेत, 1 फरार

सातारा := साताऱ्यातील तासवडे एमआयडीसीत शेतीचे खते बनवण्याचा कंपनीत 6 कोटी 35 लाखांचे कोकेन आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. सुर्यप्रभा फाॅर्मकेन कंपनीतून कराड आणि तळबीड पोलीसांनी तब्बल 6 कोटी 35 लाखाचे 1270 ग्रॅम कोकन जप्त केले आहे. या प्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून कंपनीचा मालक आणि मुख्य आरोपी अमरसिंह देशमुख एका ड्रग्स प्रकरणात तेलंगणा पोलिसांच्या अटकेत आहे.

कराड मलकापूर शहरातील नामांकित सिटीतील समीर पडवळ, पाटण तालुक्यातील मल्हारपेठ आणि आवर्डे गावातील संशयितांना अटक करण्यात आली आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील दौंड मधील विश्वनाथ शिपणकर हा संशयित आरोपी फरार आहे. याबाबतची माहिती सातारा पोलीस प्रमुख तुषार जोशी, अप्पर पोलीस प्रमुख वैशाली पाटील, अमोल ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांचे मार्गदर्शनाखाली अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी, स. पो. नि. किरण भोसले, अमीत बाबर, पोलीस उप निरीक्षक साक्षात्कार पाटील, सतिश आंदेलवार, ग्रेड पोउनि श्री. काळे, स. फौ. शशिकांत खराडे, पोलीस हवालदार शहाजी पाटील, योगेश भोसले, आंनदा रजपूत, गोरखनाथ सांळुखे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश विभुते, अभय मोरे, सुंशात कुंभार, महेश शिंदे, प्रविण गायकवाड, गणेश राठोड, ऋषिकेश वेल्हाळ, महिला पोलीस अंमलदार विनया वाघमारे, रत्ना कुंभार, शितल मोहिते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील स. फौ. संतोष सपाटे, दिनेश घाडगे, पोलीस हवालदार असिफ जमादार, संताजी जाधव, प्रशात चव्हाण, प्रविण पवार, पोलीस नाईक सागर बर्गे, दिपक कोळी, पोलीस कॉन्स्टेबल मयुर देशमुख, अनिकेत पवार, वैभव पवार, सुरज चिंचकर, अमोल फल्ले, राजाराम बाबर तसेच फॉरेन्सिक विभागाचे पोलीस हवालदार प्रशात ताटे, दिनानाथ जाधव तसेच इंटरशिप करणारे प्रशिक्षणार्थी शंभुराज सांळुखे व आदित्य लोंढे सायबर पोलीस ठाणेचे पोलीस कॉन्स्टेबल रणजित कुंभार, प्रशात मोरे, ओकांर डुबल, सुशांत घाडगे यांनी केलेली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close