Shekar Patil Maqheshwari Infra 1
अहमदनगरउत्तर महाराष्ट्रकोल्हापूरताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेप्रशासनबीडब्रेकिंगमराठवाडामुंबईराजकियराज्यविदर्भसांगलीसातारासामाजिकसोलापूर

मनोज जरांगेचं 20 व्या दिवशी उपोषण मागे : सातारा, कोल्हापूर गॅझेटसाठी तीन महिन्यांची मुदत वाढ

पाटोदा (हॅलो न्यूज):- मनोज जरांगे यांचं विसाव्या दिवशी उपोषण मागे घेतल आहे. मात्र, आंदोलन चालू राहणार असल्याच म्हटल आहे. पाटोदा, जि. बीड इथ शिष्टमंडळ आणि जरांगे यांची चर्चा झाली.

कुणबी नोंदी कमी न करता मिळालेल्या नोंदीचे प्रमाणपत्र वाटप करावे

हैदराबाद गॅझेट नुसार प्रमाणपत्र वाटप करा, व्हीलिडीटी द्या.  तीन महिन्याची सातारा कोल्हापूर गॅझेटसाठी मुदत वाढ

प्रसाद लाड : मनोज जरांगे यांच्या उपोषणाला 20 दिवस होत आहे. त्यामुळे जरांगे यांना विनंती करण्यासाठी आलो आहे.त्यांच्या तब्बेतीची सरकारला काळजी आहे.

राधाकृष्ण विखे पाटील :
सातत्याने मराठा समाजाच्या प्रश्नासाठी जरांगे यांनी संघर्ष केला. आम्हीही त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा केला. हैद्राबाद गॅझेटीयर बाबत त्यांच्या काही मागण्या होत्या.

सातारा गॅझेट बाबत 1100 पानांचा अहवाल आहे. याबाबत 3 ते 4 महिन्यात आम्ही कारवाई करू. अभ्यासासाठी यात वेळ हवा आहे. हैद्राबाद गॅझेटबाबत याचिका सध्या न्यायालयात पेंडींग आहे. यामध्ये हैद्राबाद गॅझेटच्या जीआरला स्थगिती मिळणार नाही.याची काळजी घेतली जाईल. सरकारकडून मि तुम्हाला विनंती करतो की उपोषण स्थगित करण्यात यावे.

मनोज जरांगे :
आपण पाटोदा येथे मुक्काम करून पुढे निघणार होतो. आजचा दिवस आपल्याला मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आनंदाचा आहे सगळ्यांना मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा. आपण अन्याय खूप सहन केले. आपल्यासाठी मुक्ती संग्राम दिन हा सण आहे

पाटोदा येथील मराठा समाजाच्या समितीने हा लढा लाऊन धरला. सातारा कोल्हापूर पुणे औंध संस्थांनच्या गॅझेटीयरचा जीआर आम्हाला द्यावा लागणार आहे. पण तुम्ही टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. या गॅझेटीयरचा जीआर काढून तुम्हाला अंमलबजावणी करावी लागणार आहे.

१) न्या. संदीप शिंदे समितीनं शोधलेल्या 58 लाख नोंदी कमी होणार नाही हे तुम्हाला लेखी द्यावे लागणार,एकही नोंद कमी होता कामा नये या नोंदी वाटप करणे आणि त्याची व्हॅलीडिटी द्यावी लागणार,याचा मला टाईमबॉण्ड द्या त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांची सही असायला हवी तसेच मुख्यमंत्र्यांनी मिडियासमोर येऊन याबाबत आश्वासन द्यायला हवे

2) हैदराबाद गॅझेट संख्येनुसार कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलीडिटी द्यावी लागणार, हैद्राबाद गॅझेट जीआर सुधारीत करून द्या.तुम्ही मराठ्यांना वेड्यात काढू नका.तुमच्या आमच्या झालेल्या चुका सोडून द्या .हिंदू वाणी हिंदू वैश्य आणि वैश्य वाणी या तिन्हीही जाती एकच असल्याचा जीआर अलीकडे राज्य सरकारने काढला आहे. तसा जीआर मराठा कुणबी एकच असल्याचा जीआर काढा.या समाजाला एक न्याय आणि आम्हाला एक न्याय का.?स्वतंत्रपूर्व काळात मराठा हा कुणबी होता.नजरचुकीने तो आरक्षणात घ्यायचा राहिला असा उल्लेख वरील जातीचा जीआर काढताना केला तसा आमच्या जीआरमध्ये टाका

जर आमच्या बाबत घेतलेल्या निर्णयाच्या जीआर बाबत कोर्टात चॅलेंज होतं तर मग या बाकीच्या जातीबाबत सुद्धा होऊ द्या. *तुम्हाला वेळ मारून न्यायचा असेल तर आमचं आंदोलन चालूच राहू द्या

चांगल्या अधिकाऱ्यांना कुणबी रेकॉर्ड शोधण्याचे काम द्या
आम्ही कुणालाही वैरी समजलेले नाही ना फडणवीस ना अजितदादा ना एकनाथ शिंदे,पण तुम्ही समोर होऊन वार कराल तर आम्हीही वार करू

मराठवाडयातील 4 लोकप्रतिनिधीचे रद्द करण्यात आलेले 4 कुणबी प्रमाणपत्र वैध करून द्या

आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी मात्र संजय शिरसाठ यांचे वक्तव्य मुळे शिंदे यांच्यावर नाराज तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बावनकुळे यांच्या मुळे आम्ही नाराज

समाज सोडून मी विचार करत नाही. आम्ही या मुद्यावर तयार आहोत असं फडणवीस यांनी व्हिडीओ तयार करून सांगावं. EWS, SEBC करून द्या, सारथीचे विषय मार्गी लावा,आरक्षण आंदोलनात बलिदान गेलेल्या कुटुंबीयांचा अवमान करू नका

आरक्षण आंदोलनात बलिदान गेलेल्या कुटुंबियांना MIDC मध्ये शिबिरासाठी बोलावलं आणि अवमान करून पाठवले

आजपासून आम्ही सरकारला वेळ जरी दिला तरी हे आंदोलन सुरूच यापुढे कधीही राहणार,कारण निर्णायक आंदोलन असं या आंदोलनाला नाव दिलेलं आहे

अजून कुणबी नोंदी शोधा,ही मोहीम व्यापक राबवा तुम्ही हो म्हणता आणि काहीच करत नाही.

राधाकृष्ण विखे- पाटील :
सातारा कोल्हापूर औंध संस्थानचा अहवाल 3 ते 4 महिण्यात येईल तो 1600 पानांचा अहवाल आहे.

हैद्राबाद गॅझेट व्हॅलीडीटी सगळ्या जात पडताळणी समितीचे शिबिर घेणार,आपली फसवणूक आणि समाजाची फसवणूक होणार नाही.

आमची विनंती आहे की आपलं उपोषण स्थगित करावं

प्रसाद लाड : –आज मुख्यमंत्री मराठवाडयात आहेत ध्वजारोहण झाल्यानंतर ते याबाबत भाषणात बोलतील

मनोज जरांगे :
नोंदी कमी होणार नाहीत हे खरं आहे ना
राधाकृष्ण विखे : हो कमी होणार नाही

जरांगे- हैद्राबाद गॅझेट जीआर दुरूस्ती करा
दादा भुसे--मागासवर्ग आयोगाने तसा अहवाल आल्यानंतर वैश्यवाणी समाजाबाबत तसा अहवाल आल्यानंतर सरकारने जीआर काढला.

राधाकृष्ण विखे :- हैद्राबाद गॅझेट जीआर मध्ये सुधारणा करू काही अडचणी येणार नाही.

जरांगे : मी तुम्हाला नोंदी शोधणारे लोक देतो ते तुम्ही घ्या
राधाकृष्ण विखे : ठीक आहे द्या घेतो

जरांगे : 58 लाख नोंदी कमी होणार नाहीत हे सरकार कडून आपण लेखी घेऊ.तसा टाईम बॉण्ड करून घेणार आहोत.

कुणबी नोंदी शोधणारे लोक घेउत.-विखे

जरांगे :- आता मी शेवटचा विश्वास सरकारवर ठेवत आहे विश्वाससात झाला तर विश्वास ठेवणार नाही. **हेआंदोलन पूर्ण यशस्वी झाल्याशिवाय आपण थांबवणार नाही.हे आंदोलन सुरूच राहील
पण सरकारने सातारा कोल्हापूर औंध संस्थानच्या जीआर काढण्यासाठी सरकारला वेळ हवा आहे.*त्यासाठी आपण सरकारला शेवटची संधी देऊ.बैठकांच्या माध्यमातून आंदोलन सुरूच ठेऊ.आपण 3 महिने सरकारला गॅझेटीयरचे जीआर काढण्यासाठी देऊ 90 दिवस सरकारला देऊन टाकू

शेवट झाल्याशिवाय आंदोलन सुरूच ठेऊ.पण सरकारला वेळ देऊ
सरकारला सातारा कोल्हापूर औंध पुणे गॅझेटीयरचा जीआर काढण्यासाठी जरांगे यांच्याकडून 90 दिवस वेळ,जरांगे यांच्याकडून घोषणा, तोपर्यत बैठका सुरू ठेऊ

नुसत्या हुल्लडबाजीने समाज पुढे नेता येणार नाही-जरांगे

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close