सुपनेतील कुस्ती मैदानात दोन लाखांची कुस्ती रंगली : उपमहाराष्ट्र केसरी माऊली जमदाडेने मैदान मारले
श्री. पांडुरंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित निकाली कुस्ती मैदान

कराड (हॅलो न्यूज) – सुपने येथील श्री. पांडुरंग देवाच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले. या मैदानात १०० हून अधिक कुस्त्या लावण्यात आल्या. पहिल्या क्रमाकांच्या कुस्तीसाठी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान माऊली जमदाडे आणि बारामतीचा पैलवान भारत मदने यांच्यात दोन लाख रुपयांची कुस्ती रंगली. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत उपमहाराष्ट्र केसरी माऊली जमदाडेने भारत मदनेचा गुणांवर पराभव करत दोन लाखांची कुस्ती जिंकली. पहिल्या क्रमाकांचे दोन लाखांचे बक्षीस रंजनाताई शिवाजीराव पाटील यांच्या स्मरणार्थ युवा उद्योजक शेखर पाटील यांनी दिले. या कुस्ती मैदानात शिवछत्रपती कुस्ती केंद्राच्या पैलवानाचे वर्चस्व पहायला मिळाले.

यावेळी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, युवा उद्योजक शेखर पाटील, सारंग पाटील, जिल्हा परिषद सदस्य धनंजय उर्फ रवी ताटे, बलराज पाटील, पै. सतिश डांगे, पै. सुनिल मोहिते, पै. बाजीराव शेवाळे, पै. सुनिल मोहिते, निवास शिंदे, पै. सतिश पानगुडे, सुशांत पाटील, धनाजी पाटील, विनोद पाटील, अमित पाटील, वस्ताद प्रशांत पाटील, हिंदुराव पाटील, भागवत कांबळे, भिमराव कुंभार, आबासो पाटील, जगन्नाथ गायकवाड यांच्यासह सुपने गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
सुपने येथील श्री. पांडुरंग देवाच्या यात्रेतील प्रमुख लढती व विजेते पुढीलप्रमाणे-
क्रमांक 2- पै. दिग्विजय जाधव (टिटवे) विरूध्द पै. सनी मदने (कोल्हापूर) यांच्यातील कुस्ती बरोबरीत सुटली.
क्रमांक 3- पै.सुजित चव्हाण (सुपने) विरूध्द पै. आदित्य पाटील (सांगली) यांच्यातील कुस्तीत सुपनेच्या पै. सुजित चव्हाणने मैदान मारले.
क्रमांक4- पै. निखिल पाटील (सुपने) विरूध्द पै. शिवम कांबळे (कोल्हापूर) यांच्यात सुपनेच्या पै. निखिलने बाजी मारली.
क्रमांक 5- पै. रणजित मंडले (सुपने) विरूध्द पै. कुवेरसिंग रजपूत (सांगली) या कुस्तीत पै. रणजितने कुस्ती जिंकली.
क्रमांक 6- पै. अमित चाैगुले (सुपने विरूध्द पै. विशाल शिंदे (कुंडल) या कुस्तीतही सुपनेच्या पै. अमितने बाजी मारली.



