भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांचे नांदेडमध्ये उत्स्फूर्त स्वागत
पक्षवाढ, संघटन बळकटीकरणासह शेतकरीहिताच्या योजनांवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा

नांदेड :- भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांचे नांदेड येथे आगमन झाल्यानंतर किसान मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. प्रदेश कार्यकारिणी सदस्य दत्ता भाऊ शेंबाळे फुलववळकर यांच्या वतीने नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात वेताळ यांचा सत्कार करण्यात आला. रामकृष्ण वेताळ हे लातूर-नांदेड मार्गे पूर्वनियोजित विदर्भ दौऱ्यावर जात असताना नांदेड येथे मुक्कामी होते. या दौऱ्या दरम्यान त्यांनी किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत पक्षवाढ आणि संघटनात्मक बळकटीकरणाबाबत चर्चा केली.

शेतकरी हिताच्या योजनांची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्या प्रश्नांशी सातत्याने संपर्क ठेवणे. यासाठी किसान मोर्चाकडून करण्यात येत असलेल्या विविध प्रयत्नांचाही श्री. वेताळ यांनी उल्लेख केला. संघटनात्मक पातळीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिक सक्रियपणे काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, प्रदेश कार्यकारिणी सदस्य दत्ता भाऊ शेंबाळे फुलववळकर यांच्या वतीने रामकृष्ण वेताळ यांचा शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रंगनाथ सोळंके, जिल्हाध्यक्ष धनराज शिरोळे, निखिल, गोपीनाथ कांबळे, भाजपा किसान सरचिटणीस रंगनाथ सोळंके, मोर्चा प्रदेश प्रदेश कायकारणी सदस्य दत्ताभाऊ शेंबाळे, जिल्हा अध्यक्ष धनराज शिरोळे,जिल्हा अध्यक्ष सुधाकर कदम, सरपंच दत्ता पाटील नवले, भाजपा अनुसूचित मोर्चा अध्यक्ष विलास साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पक्षाची विचारधारा, भूमिका, ध्येय-धोरणे तसेच संघटन अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर यावेळी विचारविनिमय करण्यात आला. शेतकरी हा पक्षाच्या कार्याचा महत्त्वाचा केंद्रबिंदू असून शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्याची आवश्यकता असल्याचे वेताळ यांनी यावेळी सांगितले. केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधी, कर्जमाफी तसेच अन्य शेतकरीहिताच्या निर्णयांबाबत त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.



