सातारा जिल्ह्याला 3 दिवस ऑरेंज अलर्ट : कोयनेत 26 टक्के पाणीसाठा
पाटण | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला गेल्या 24 तासात दीड टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. कोयना धरण क्षेत्रात यावर्षी पहिल्यांदाच प्रतिसेंकद 16 हजार 18 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे सध्या कोयना धरणात 27. 27 टक्के पाणीसाठी झाला आहे.
सातारा जिल्ह्याला आज येलो तर पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे पावसाची शक्यता चांगली वर्तवली जात असून पेरण्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिले आहे. शेतात सध्या यांत्रिकरणाद्वारे पेरण्या उरकरण्यावर शेतकरी भर देत आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नसल्याने दुष्काळी तालुक्यात अद्याप आभाळाकडे शेतकरी डोळे लावून आहे.
कोयना धरणात 27. 27 टीएमसी पाणीसाठी
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत कोयनानगर 77 व नवजाला 98 मिलिमीटर व महाबळेश्वरला 150 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाची पाणीपातळी 2071′ 03″ फूट झाली असून, पाणीसाठ्यात संथ गतीने वाढ होत असून, धरणाचा एकूण पाणीसाठा 27.27 टीएमसी झाला आहे.तर धरणात प्रतिसेंकर 16 हजार 18 क्युसेस पाण्याची आवक आहे.