ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनराज्यशैक्षणिकसातारा

कराड तालुक्यातील 32 गुणवंत शिक्षकांचा पुरस्काराने गाैरव : आदर्श केंद्रप्रमुख निवास पवार

कराड |  तालुका स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने 32 शिक्षकांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून गाैरविण्यात आले. यामध्ये आदर्श केंद्रप्रमुख पुरस्काराने निवास पवार यांना तर आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सैदापूर शाळेचे मुख्याध्यापक युवराज बागुल यांना गाैरविण्यात आले. या कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, माजी जि.प. सदस्य उदयसिंह पाटील, प्रदीप पाटील, उत्तम पाटील, कराड पंचायत समिती गटविकास अधिकारी मीना साळुंखे, प्रमुख वक्ते युवराज पाटील, कराड पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी सन्मति देशमाने, शिक्षण विस्तार अधिकारी मुलाणी मॅडम आणि रमेश कांबळे यांच्यासह केंद्रप्रमुख, पुरस्कार प्राप्त शिक्षक, तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक बँकेचे संचालक उपस्थित होते.

प्रमुख वक्ते युवराज पाटील यांनी आजची – शिक्षण व्यवस्था, दैनंदिन जीवनात आवश्यक असणारी जीवनकौशल्ये, समाजात हरवत चाललेली संवेदनशीलता व्यक्तीमत्व विकास साधायासाठी आणि विद्यार्थी – विकासासाठी आवश्यक घटक कोणते याचे विवेचन केले. पुरस्कार प्राप्त शिक्षकांमधून प्रातिनिधीक स्वरूपात वाठार शालेचे शिक्षक श्री. आनंदा कोळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन वैशाली शेकडे आणि अनंत- आघात यांनी केले. गटशिक्षणाधिकारी सन्मती देशमाने यांनी प्रास्ताविक केले. केंद्रप्रमुख मधुसुदन सोनवणे यांनी आभार मानले.

पुरस्कार प्राप्त शिक्षक यादी पुढीलप्रमाणे (कंसात शाळा गाव) ः-
1) पुजा उदय भंडारे (उंब्रज मुले), 2) दादा खंडू रावते (मरळी), 3) आबा राजाराम शिरतोडे (आकाईवाडी), 4) रामकृष्ण यशवंत थोरात (तुळसण), 5 सुप्रिया सुनिल काळोलीकर (काले मुली), 6) अरुणा राजेंद्र खंदारे (यशवंतनगर), 7) गीता महादेवराव गावडा (तारुख), 8) सदानंद नानासो साबळे (शरदनगर), 9) योगेश संभाजी माने (आनंदपूर- अंधारवाडी), 10) सचिन सिताराम कुंभार (घोलपवाडी), 11) राजेश तुकाराम मोरे (किरपे), 12) शिवांजली प्रल्हाद साळुंखे (शिरगाव), 13)  वैशाली हरिचंद्र माने (करवडी), 14) संतोष किसन बाबर (शिंदेमळा), 15) मनोजकुमार चंद्रकांत कुलकर्णी (वाघेश्वर), 16) यशवंत नामदेव कांबळे (गणेशवाडी), 17) भास्करराव शिवाजी चव्हाण (म्हासोली), 18) सुनिता सूर्यकांत शिंदे (रेठरे बु मुली), 19) सविता दिलीप कुंभार (शेणोली मुली), 20) सुरेश शंकर तेली (खोडशी), 21) आनंदा गोविंदा कोळेकर (वाठार), 22) आनंद रघुनाथ गायकवाड (येरवळे नं-1), 23) रविंद्र यशवंत डवरी (विजयनगर), 24) ज्योती बसवेश्वर चेणगे (पाडळी), 25) विलास दत्तात्रय घावटे (चिखली), 26) युवराज शैलेन्द्र वळवके (दुशेरे), 27) धनाजी प्रल्हाद कोळी (चैनीमळा), 28) सरिता राजेश पाटील (जुने पोतले), 29) संध्या सचिन चव्हाण (कोर्टी), 30) शहनाज अकबर शेख (वाघेरी – उर्दू), 31) युवराज बकाराम बागुल (सैदापूर), निवास अंतू पवार (तांबवे- केंद्रप्रमुख)

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker