आ. बाळासाहेब पाटील सरकारच्या बाजूचे का? ते जाहीर करावे : धैर्यशील कदम

– विशाल वामनराव पाटील
कराड उत्तर मतदार संघातील विकास कामांच्या निधीवरून काल आ. बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत भाजपाच्या नेत्यांच्यावर टीका केली होती. त्याला आज भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम उत्तर देताना आ. पाटील यांनी आमदारांनी आधी आपण सरकारच्या बाजूने की विरोधात आहोत, हे जाहीर करावे. दोन्ही डगरीवर हात ठेवून बोलू नये. सरकारच्या बाजूने असतील तर आम्ही बसून मिटवून घेवू तर विरोधात असतील तर त्यांना निधी सरकार देत नसते, असे म्हटले आहे.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी कराड उत्तरचे युवानेते मनोज घोरपडे, विक्रम पावसकर, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, मुकुंद चरेगावकर, कराड दक्षिणचे अध्यक्ष पै. धनाजी पाटील, महेशकुमार जाधव, भारत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, आघाडी प्रदेश सचिव मानसिंग कदम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
धैर्यशील कदम म्हणाले, बाबा मुख्यमंत्री असताना 2014 च्या निवडणुकीच्या अगोदर 150 कोटीचा निधी आणला होता. त्याला जनता साक्षीदार आहे. तेव्हा त्यावेळी निधी आणला होता, त्यानंतर 2019 सालीही निधी आणला होता. आताही परवा 60 कोटीचा निधी आणला आहे, त्याबाबतची कागदपत्रे घेवून मसूरच्या चाैकात उत्तर मतदार संघातील विषयावर येवू, तर जिल्ह्याच्या विषयावर आम्ही दत्त चाैकात येवू. आ. पाटील हे अडीच वर्षे मंत्री होते, तेव्हा त्यांनी निधी का आणला नाही?