ऊसाला 5 हजार दर द्या नाहीतर हवाई अंतरांची अट रद्द करा : रघुनाथ पाटील
कराड | महाराष्ट्रात 25 कुटुंबाच्या मालकीचे 200 साखर कारखाने आहेत. त्यामुळे संबध ऊसाचे हे मालक झाले आहेत. शेतकरी कायदे त्यांनी आपल्या अधिकारात केले आहेत, ते शेतकरी विरोधी कायदे आम्ही मोडित काढणार. ऊसाला 5 दर द्या नाहीतर नसेल तर दोन कारखान्याच्या मधील हवाई अंतराची अट रद्द करा, अशी मागणी शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केली आहे.
कराड येथे शेतकरी संघटनेचे कराड तालुका उत्तरचे अध्यक्ष वसिम इनामदार यांच्या उपोषणाला भेट दिली, त्यावेळी रघुनाथ पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, आज ऊस, सोयाबीन, कापूस असो की टोमॅटो, कांदा घेणारा शेतकरी असो कोणताच शेतकरी सुखात नाही, कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. शेतकऱ्यांचं जगणं कठिण तर राज्यकर्ते निराढवलेले आहेत.
सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकरांना टोला
आज सर्व गोष्टी केवळ राजकारणांसाठी सुरू असून मागच्या वेळी आझाद मैदानावर भाजपाच्या लोकांनी एसटी सरकारच्या मालकीची करण्यासाठी आंदोलन केली. तेव्हा आता भडव्यांनो करा की एसटी राज्याची मालकीची अशी टीका आ. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्यावर केली. चांगल्या संस्था मोडित काढण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. मीरा बोरवणकरांनी सांगितलं काय लायकीचे उपमुख्यमंत्री आहेत.